प्रणवपर्वाचा अस्त - मॅन ऑफ ऑल सिझन

pranab mukharjee
pranab mukharjee

भारतीय राजकारणात पाच दशकांपासून सक्रिय असणारे प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड होणे, हा त्यांच्या कारर्किदीचा सर्वोच्च सन्मान हाेता. त्यांची कार्य कुशलता, व्यूहरचनात्मकता, वरिष्ठ वर्तुळात वावरणे यामुळे त्यांना ‘मॅन ऑफ ऑल सिझन’ असे म्हटले जायचे.

भारतीय राजकारणातील आदरणीय व्यक्तीमत्व. विद्वान, अभ्यासू, चाणाक्ष, व्यूहनितीतज्ज्ञ अशी कितीतरी विशेषणे लागू पडणारे व्यक्तीमत्व म्हणजेच प्रणव मुखर्जी. भारताचे राष्ट्रपतीपद भूषविलेल्या मुखर्जी यांना २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव करून, त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. काँग्रेस पक्षात आणि विविध सरकारांत मुखर्जी यांनी अत्यंत जबाबदारीची पदे भूषवली. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या अभ्यासूपणाचा ठसा उमटवला, काँग्रेसच्या कोअर टिममध्ये अनेक दशके ते टिकून राहिले, त्यामागे त्यांची उपयुक्तता, व्यूहरचना, अभ्यासूपणा, सर्वांशी असलेले सौहार्दाचे निकटचे संबंध कारणीभूत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यांच्याही नंतर सोनिया यांच्या विश्वासातील म्हणूनच गणले गेले. सतत काँग्रेसच्या उच्च वर्तुळात त्यांचा वावर राहिला. १९८२-८४ या काळात ते देशाचे पहिल्यांदा अर्थमंत्री झाले आणि राष्ट्रपती होण्याआधीही ते याच पदावर २००९-१२ दरम्यान होते.

संसदेतील वाटचाल -

  • जुलै १९६९ : राज्यसभा खासदार
  • फेब्रुवारी १९७३ ते जानेवारी १९७४ : केंद्रात औद्योगिक विकास खात्याचे उपमंत्री.
  • जानेवारी १९७४ ते ऑक्टोबर १९७४ : केंद्रीय जहाज आणि वाहतूक उपमंत्री.
  • ऑक्टोबर १९७४ ते डिसेंबर १९७५ :  केंद्रीय अर्थराज्यमंत्री.
  • जुलै १९७५ : दुसऱ्यांदा राज्यसभेवर.
  • डिसेंबर १९७५ ते मार्च १९७७ : केंद्रात महसूल आणि बँकिंग खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार).
  • १९७८–१९८० : काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील उपनेते.
  • १९७८ ते १९८६ आणि १९९७ ते २०१२ : काँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य.
  • १९७८ ते १९७९ : काँग्रेसचे कोषाध्यक्ष.
  • जानेवारी १९८० ते जानेवारी १९८२ : पोलाद आणि खाण, वाणिज्य मंत्री.
  • १९८०-१९८५ : राज्यसभेतील नेते. 
  • ऑगस्ट १९८१ : तिसऱ्यांदा राज्यसभेवर
  • जानेवारी १९८२ : डिसेंबर १९८४ : वाणिज्य आणि पुरवठा खात्याचा अतिरिक्त कारभार.
  • जून १९९१ ते मे १९९६ : नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
  • १९९३ : चौथ्यांदा राज्यसभेवर.
  • फेब्रुवारी १९९५ ते  मे १९९६ : परराष्ट्र मंत्री.
  • १९९६ ते २००४ : राज्यसभेतील काँग्रेसचे पक्ष प्रतोद.
  • १९९६ ते १९९९ : परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य.
  • १९९९ : सलग पाचव्यांदा राज्यसभेवर.
  • जून १९९८ ते मे २००४ : गृह खात्याच्या स्थायी समितीचे सदस्य.
  • १२ डिसेंबर २००१ ते २५ जून २०१२ : केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य.
  • १३ मे २००४ : लोकसभेवर निवडून गेले.
  • २३ मे २००४  ते २४ ऑक्टोबर २००६ : संरक्षण मंत्री.
  • जून २००४ ते जून २०१२ : लोकसभेतील सभागृह नेते.
  • २५ आँक्टोबर ते २३ मे २००९ : परराष्ट्र मंत्री.
  • २४ जानेवारी २००९ ते मे २००९ : केंद्रीय अर्थमंत्री.
  • २० मे २००९ : पंधराव्या लोकसभेवर निवड.
  • २००९ ते २६ जून २०१२ : केंद्रीय अर्थमंत्री.
  • २५ जून : काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

आंतरराष्ट्रीय कारकिर्द -

  • १९८२-८५ आणि २००९-१२ : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी.
  • १९८२-८५ आणि २००९-१२ : जागतिक बँक.
  • १९८२-८५ आणि २००९-१२ : अशियाई विकास बँक.
  • १९८२-८५ आणि २००९-१२ : आफ्रिकन विकास बँक.

अध्यक्षपदे -

  • १९८४ आणि २०११-१२ : जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यावर २४ देशांच्या गटांचे अध्यक्षपद.
  • मे १९९५ आणि नोव्हेंबर १९९५ : दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना (सार्क).
  • मे १९९५, नोव्हेंबर १९९५ आणि एप्रिल २००७ : सार्कच्या मंत्री परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

मानसन्मान -

  • १९८४ : युरोमनी मासिकाचा बेस्ट फायनान्स मिनिस्टर आँफ द वर्ल्ड पुरस्कार.
  • १९९७ : सर्वोत्कृष्ट संसदपटू.
  • २००८ : पद्मविभूषण
  • २०१० : फायनान्स मिनिस्टर आँफ द इयर फॉर एशिया. (दोन आंतरराष्ट्रीय संस्थांकडून गौरव)
  • २०११ : डीलिट (वुल्हवहॅम्पटन विद्यापीठ)
  • २०१२ : डीलिट (विश्वेश्वरैय्या टेक्नाँलाँजी युनिव्हर्सिटी आणि आसाम विद्यापीठ)
  • २०१३ : बांगलादेश सरकारकडून सन्माननीय डॉक्टरेट.
  • २०१३ : बांगलादेशचा दुसऱ्या क्रमांकाचा ‘मुक्तीजुद्दा’ सन्मान
  • २०१३ : डाँक्टर आँफ सिव्हिल लॉ (मॉरिशस)

ग्रंथसंपदा -

  • १९६९ : मिडटर्म पोल
  • १९८४ : बियाँड सर्व्हायवल : इमर्जिंग डायमेन्शन्स ऑफ इंडियन इकॉनॉमी
  • १९९२ : चॅलेंजेस बिफोर द नेशन.
  • १९९२ : सागा आँफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस.

नेत्यांच्या प्रतिक्रिया....
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे देहावसान म्हणजे एका युगाची समाप्ती आहे. सार्वजनिक जीवनात अतिशय उंचीवर पोचलेल्या प्रणवदांनी एखाद्या संताप्रमाणे भारत मातेची अहर्निश सेवा केली. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती

प्रणवदांच्या निधनाने देशाने दूरदृष्टी असलेला एक वरिष्ठ नेता गमावला आहे. अखंड कार्यमग्नता, शिस्त व समर्पण यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात आदराचे स्थान मिळवले.
- व्यंकय्या नायडू, उपराष्ट्रपती

प्रणवदांच्या निधनामुळे देशाच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचा दीर्घ अनुभव त्यातली शिस्त यांचा लाभ देशातील अनेकच सरकारांना वेळोवेळी होत आला आहे.
- राजनाथसिंह, संरक्षणमंत्री

त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणात एक मोठे शून्य निर्माण झाले समर्पण भावाने देशसेवा करणारे आणि देशासाठी अभिमान वाटावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

प्रणवदा संसदेतील आदरणीय सहकारी आणि प्रिय मित्र होते. सोपविलेली कोणतेही जबाबदारी ते पूर्ण करायचे. देशाने नामवंत मुत्सद्दी आणि झुंजार सुपुत्र गमावला आहे.
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

प्रणवबाबूंसारख्या विद्वान, अनुभवी व्यक्तीची राष्ट्रपती भवनात गरज आहे, असे शिवसेनाप्रमुखांचे मत होते आणि त्याबाबत प्रणवबाबू नेहमीच कृतज्ञता व्यक्त करत. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जीं यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील सर्वमान्य, सर्वसमावेशक नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतमातेचा सेवक हरपला आहे. अनेक जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशाने एक थोर मुत्सद्दी गमावला आहे. देशाची अर्थनीती आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. 
- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com