esakal | एम्स सूत्रांनी दिले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

Former Prime Minister, Dr Manmohan Singh

नवी दिल्ली : अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी रात्री उशीराने प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी त्यांना कार्डिओ थोरॅसिस वार्डात आवश्यक ते उपचार सुरु आहेत. 

एम्स सूत्रांनी दिले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या प्रकृतीसंदर्भातील अपडेट्स

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : अर्थतज्ज्ञ आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रविवारी रात्री उशीराने प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना नवी दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असून त्यांनी त्यांना कार्डिओ थोरॅसिस वार्डात आवश्यक ते उपचार सुरु आहेत. 

भारताचा जीडीपी शून्यावर जाणार; काळजी व्यक्त करणारा अहवाल

एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 87 वर्षीय Former Prime Minister मनमोहन सिंग यांना एका औषधामुळे  रिअ‍ॅक्शन आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ताप तसेच अन्य कारणांची तपासणी करण्यात आली असून योग्य तो उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लॉकडाउनच पुढं काय? 

Dr Manmohan Singh  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून सध्याच्या घडीला ते राजस्थानचे राज्यसभा खासदारही आहेत. 2004 ते 2014 या दोन हंगानात त्यांनी देशाच्या नेतृत्वाची धूरा सांभाळली आहे. 2009 मध्ये  एम्समध्येच मनमोहन सिंग यांच्यावर कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी करण्यात आली होती. मनमोहन सिंग यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्याची प्रार्थना केली होती.