

Ashish Banerjee Dies, Note Found at TMC Office
Esakal
पश्चिम बंगालचे माजी विधानसभा उपसभापती आशीष बॅनर्जी यांचा मृतदेह तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली. रामपुरहाटमध्ये आशीष यांच्या घराजवळच पक्षाचं कार्यलय आहे. तिथं रविवारी सकाळी ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी सुसाइड नोटही आढळली आहे. पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली असून त्याची पडताळणी केली जात आहे.