PM मोदींच्या दौऱ्याला बांग्लादेशींचा विरोध;आंदोलनातील झटापटीत चौघांचा मृत्यू

bangladesh
bangladesh

ढाका : पंतप्रधान नरेंद्र दोन दिवसीय बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या 50 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठीचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रण आहे. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी मोदींना गार्ड ऑफ ऑनर दिला गेला. मात्र, त्यांच्या या दौऱ्याला काही बांग्लादेशी नागरिकांचा विरोध आहे. त्यांच्या या बांगलादेश भेटीला विरोध दर्शवण्यासाठी आज बांग्लादेशची राजधानी ढाका येथे निदर्शनं करण्यात आली. या निदर्शनांना हिंसक गालबोट लागलं. ही निदर्शनं करणाऱ्यांवर पोलिसांकडून रबरी बुलेट्सचा मारा करण्यात आला त्यामुळे या बांगलादेशातील चित्तागोंग येथील चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा - 'बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी मी केलेला सत्याग्रह'; PM मोदींनी अभिमानाने सांगितली आठवण
बांगलादेशातील माध्यमांच्या वृत्तांनुसार, चटगांवमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यानंतर हथाजरी मदरश्यातून विरोध मोर्चा काढण्यात आला होता. पोलिसांसोबत झालेल्या या झटापटीत अनेक लोक जखमी झाले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती देताना रफिकुल इस्लाम या पोलीस अधिकाऱ्यांने म्हटलंय की, पोलीस स्टेशनमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा व रबरी बुलेट्सचा मारा केला. यावेळी पोलिसांसोबत झालेल्या संघर्षात दोन पत्रकारांसह अनेकजण जखमी झाल्याची देखील माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनेक मुस्लिम संघटना आणि डाव्या पक्षांच्या संघटना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याविरोधात रॅली काढत आहेत. त्यांचा दावा आहे की, शेख मुजीबुर रहमान यांनी एका धर्मनिरपेक्ष देशासाठी संघर्ष केला आणि मोदी धार्मिक नेते आहेत. 

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी मोदींचा सत्याग्रह

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी म्हटलंय की, मी बांग्लादेशच्या बंधुभगिनींना अभिमानाने सांगू इच्छितो की, मी 20-22 वर्षांचा असताना बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी त्या संघर्षामध्ये सहभागी होणं माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनामधील एक होतं. माझं वय तेंव्हा 20-22 वर्षे होतं जेंव्हा मी आणि माझ्या काही साथींनी बांग्लादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता आणि तुरुंगवास देखील भोगला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com