

Purvanchal Expressway Crash
Esakal
उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय. शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जात असलेली अॅम्ब्युलन्स ट्रकमध्ये घुसला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अॅम्ब्युलन्सच्या पुढच्या भागाचा चुराडा झालाय. दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मृतदेह अयोध्येतील कुमारगंज रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.