'ती' लिंक उघडली अन्...

वृत्तसंस्था
Thursday, 19 September 2019

- मोबाईलवर पाठवली होती एक लिंक.

- लिंक ओपन करताच घातला गंडा.

नवी दिल्ली : सध्या पेटीएमच्या माध्यमातून अनेक व्यवहार केले जात आहेत. मात्र, हे व्यवहार करणे एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगलट आले आहे. आगाऊ रक्कम अदा करण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला मोबाईलवर लिंक पाठविण्यात आली होती. त्याने ती ओपन केल्यानंतर लाखाचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

निखिल अशोक मजेठिया यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी तक्रारदार मजेठिया यांना सिमेंट विकत घ्यायचे असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हेमंतने मजेठिया यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधला आणि आपण पाठवत असलेली पेटीएम लिंक उघडण्यास सांगितले. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांच्या खात्यातून 63 हजार रुपये काढण्यात आले. 

सोने, चांदीच्या भावातील घसरण कायम; पाहा आजचे भाव

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मजेठिया यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हेमंत व राकेश शर्मा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉ. मनमोहनसिंगांची होती पाकिस्तानवर हल्ल्याची तयारी; कोणी केला गौप्यस्फोट


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud with Traders through PayTM