Indore Bus Accident : मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत; CM शिंदेंची घोषणा

पंतप्रधान कार्यालयाकडूनही मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi NewsEknath Shinde Latest Marathi News

मुंबई : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. (CM Shinde announce Indore Bus Accident Relief 10 lakh each announced to relatives of deceased)

Eknath Shinde Latest Marathi News
राष्ट्रपती निवडणूक: राष्ट्रवादी, काँग्रेसच्या आमदारांनी द्रौपदी मुर्मूंना केलं मतदान!

CM शिंदे म्हणाले, पूलावरुन कोसळलेल्या एसटी बसमधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हाती आले आहेत. झालेली घटना अत्यंत दुर्देवी असून मृत्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांप्रती मी सहवेदना प्रकट करतो.

Eknath Shinde Latest Marathi News
Indore Bus Accident Live Update : आठ जणांची ओळख पटली; PM कर्यालयाकडून मदत जाहीर

याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी मी स्वतः दोनवेळा फोनवरुन चर्चा केली. त्यांनी देखील ही घटना अतिशय गांभीर्यानं घेतली आहे. एक स्वतंत्र मंत्री देखील त्यांनी या ठिकाणी नेमण्यात आला आहे. दरम्यान, राज्य शासनाच्यावतीनं मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Eknath Shinde Latest Marathi News
शिवसेनेला मोठा धक्का : माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा राजीनामा

दरम्यान, इंदूरमध्ये नर्मदा नदीवरील पूलावरुन जाणारी महाराष्ट्राची एसटी बस दुपारच्या दरम्यान कोसळली. यामधील १३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५ प्रवाशांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. मृतांपैकी ८ जणांची ओळख पटली असून त्यातील ५ जण हे महाराष्ट्रातील आहेत.

पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत

मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर, जखमींना 50,000 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com