
मित्रासोबत लग्न करण्यासाठी तरुणाने केला लिंगबदल; आता मित्रच म्हणतो लग्नाला नाही
आपल्या तरुण मित्रासोबत लग्न करता यावे, यासाठी एका तरुणाने चक्क लिंग बदल केला आणि त्याहून धक्कादायक म्हणजे ज्या मित्रासाठी लिंगबदल करुन घेतला तो मित्रच आता त्याला स्वीकारण्यास तयार नाही. पंजाब राज्यातील अमृतसर (Amritsar) जिल्ह्यातील ही घटना आहे. या संदर्भात लिंग बदल केलेल्या तरुणाने पोलिसात फसवणूकीची तक्रार दाखल केलीय. (Friend refused to marry with Young boy who already changed his gender for him in amritsar, punjab)
हेही वाचा: ‘काश्मीर फाईल्स’वरून विषारी प्रचार
एका तरुणाला आपल्या तरुण मित्रासोबत लग्न करायचे होते. त्यासाठी या तरुणाने लिंगबदल केले. तरुणाच्या निर्णयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती. तरुणाचे नाव रवि असे होते मात्र लिंगबदल झाल्यावर त्याने रिया असे नाव करुन घेतले मात्र ऐनवेळी ज्या मित्रासाठी लिंगबदल करुन घेतला तो मित्रच आता रियासोबत लग्न करण्यास तयार नाही.
हेही वाचा: हे एप्रिल फुल नव्हे! गॅस सिलेंडरचे दर पुन्हा वाढले
पोलिस तरुणाचा शोध घेत आहे. जालंधर येथे नोकरी करताना रवि हा जंडियाला येथे राहणाऱ्या अर्जुन नावाच्या मुलाच्या संपर्कात तीन वर्षापूर्वी आला होता. दोघांमध्ये मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. समाजामध्ये अर्जुनसोबत राहताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून रविने लिंगबदल केला मात्र, आता अर्जुन लग्नास नकार देतोय.
Web Title: Friend Refused To Marry With Young Boy Who Already Changed His Gender For Him In Amritsar Punjab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..