Friendship Day: आडवाणी यांनी मोठं मन दाखवलं म्हणूनच वाजपेयी भाजपचे पंतप्रधान बनले

या दोन्ही दिग्गज नेत्यांचे काही मुद्द्यांवर मतभेद होते, परंतु त्यांचे मनभेद कधीच नव्हते.
political News
political News
Summary

या दोन्ही दिग्गज नेत्यांचे काही मुद्द्यांवर मतभेद होते, परंतु त्यांचे मनभेद कधीच नव्हते.

भारतीय राजकारणाच्या इतिहासात अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची मैत्री अनेकांच्या स्मरणात राहील अशी आहे. मैत्रीच्या या गोड नात्यात महत्त्वाकांक्षेला स्थान नव्हते. काही मुद्द्यांवर मतभेद होते, परंतु त्यांचे मनभेद कधीच नव्हते. दोघांच्या वयात तीन वर्षांचा फरक आहे. सात दशकांच्या या मैत्रीचे उदाहरण येत्या काळातही दिले जाईल असे आहे.

वाजपेयी आणि अडवाणी या दोघांचा स्वभाव वेगवेगळा होता, मात्र त्यांच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर होता. दोघांच्याही पक्षात आपापले निष्ठावंत आणि जवळचे मित्र होते. त्यांच्या राजकीय प्रवासात असे अनेक प्रसंग आले. यातील बऱ्यात वेळा या दोघांची मते एकमेकांपेक्षा भिन्न होती. मात्र दोघांचेही राजकीय प्रवास आणि दोघांच्याही वाटा वेगळ्या होत्या. त्यावेळी आडवाणी यांनी मोठं मन दाखवलं म्हणूनच वाजपेयी भाजपचे पंतप्रधान बनले अशी परिस्थिती होती.

political News
No Flying Zone : लढाऊ विमानांना नियंत्रणात ठेवा; भारताने चीनला दिला इशारा

वाजपेयी आणि अडवाणी या दोघांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून (आरएसएस) राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला होता. या दोन्ही दिग्गज नेत्यांची प्रतिमा एकेकाळी हिंदुत्वाचा चेहरा म्हणून प्रसिद्ध होती. दोघांनाही साहित्य, पत्रकारिता आणि चित्रपट अशा क्षेत्रात रस होता. 1951 मध्ये जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हा आरएसएसने आपल्या आश्वासक कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाशी जोडले होते. त्यावेळी अडवाणी आणि वाजपेयी जनसंघात सामील झाले आणि दोघांनीही देशात पाय रोवण्यात मोठी भूमिका बजावली.

आणीबाणीच्या काळात दोघेही एकत्रित तुरुंगात राहिले. दोघांनी जनसंघ जनता पक्षात विलीन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या राजकारणामुळे एकेकाळी काँग्रेसचे कंबरडे मोडले होते. 1977 मध्ये देशात जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले, तेव्हा त्यांना परराष्ट्र मंत्री आणि अडवाणी यांना माहिती आणि प्रसारण मंत्री करण्यात आले.

यानंतर दोघांनी जनता पक्षापासून फारकत घेतली आणि 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) स्थापना केली. वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष झाले. 1984 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. 1986 मध्ये पक्षाने सर्वात लोकप्रिय नेते अटलबिहारी वाजपेयी यांना अध्यक्षपदावरून हटवले.

political News
ITBP Nurse Recruitment : परिचारिकांची भरती; मिळणार १ लाखाहून अधिक पगार

80 च्या दशकात पक्षात अडवाणींचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढला. अडवाणींच्या नेतृत्वाखाली पक्षाने हिंदुत्वाच्या विचारसरणीवर स्वार होऊन देशभरात ठसा उमटवण्यास सुरुवात केली. यावेळी अटल मागच्या सीटवर तर अडवाणी पुढच्या सीटवर होते. अटल अयोध्येतील राम मंदिर उभारणीच्या बाजूने होते पण त्यांना आक्रमक आणि कट्टर हिंदुत्वाचे राजकारण मान्य नव्हते. 1992 च्या बाबरी मशीद विध्वंसाच्या घटनेने ते कधीही शांत राहिले नाहीत. हा तोच काळ होता जेव्हा लालकृष्ण अडवाणी पक्षाचे ध्वजवाहक बनले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com