

How 'Cockroach' Protest Changed The Game
ESakal
नीट पेपरफुटीचा वाद केवळ परीक्षेतील अनियमिततेपुरता मर्यादित नव्हता. गेल्या महिन्याभरात हे देशातील सर्वात मोठे राजकीय वादळ बनले होते. जंतर मंतरवर आठवडाभर चाललेले आंदोलन, संसदेच्या कामकाजात सतत व्यत्यय, विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण आणि आता तर खुद्द शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
२५ जुलै २०२६ रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाने पेपरफुटी करणाऱ्यांविरुद्ध जलदगती न्यायालये आणि कठोर शिक्षेसह अधिक कडक कायद्यांची तरतूद करणाऱ्या नवीन मसुदा विधेयकालाही मंजुरी दिली. आता आपण पेपरफुटीपासून ते राजीनाम्यापर्यंतची संपूर्ण कहाणी सविस्तरपणे समजून घेऊया.