

Alcohol Flavour Violation
esakal
Alcohol Manufacturers : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) देशातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. अतिरिक्त फ्लेवर्सचा अनधिकृत वापर तसेच वयोसंबंधित दिशाभूल करणारे दावे केल्याप्रकरणी अनेक मद्यनिर्मिती कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित कंपन्यांनी त्यांच्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये, याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देशही FSSAI ने दिले आहेत.