esakal | गमतीजमती व योगायोगाचे 2021
sakal

बोलून बातमी शोधा

Happy-New-Year

‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व रंगपंचमी या तीनही सणांना २००९ सालानंतर १२ वर्षांनी प्रथमच सुट्टी असल्याने बच्चे कंपनी व तरुणाई खुशीत राहतील.

गमतीजमती व योगायोगाचे 2021

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

‘र’ अक्षराने सुरुवात होणाऱ्या रथसप्तमी, रक्षाबंधन, रंगपंचमी व रामनवमी या पाच अक्षरी सणांना सुट्टी असणाऱ्या २०२१ मध्ये २१ फेब्रुवारी, २१ मार्च, २१ नोव्हेंबरला रविवारची सुट्टी असून, २१ एप्रिलला बुधवारी रामनवमीची व २१ जुलैला बुधवारीच बकरी ईदची सुट्टी असणार आहे. रंगांची उधळण करणाऱ्या होळी, धुलिवंदन व रंगपंचमी या तीनही सणांना २००९ सालानंतर १२ वर्षांनी प्रथमच सुट्टी असल्याने बच्चे कंपनी व तरुणाई खुशीत राहतील. होळीची २८ मार्चला रविवारी, २९ मार्चला सोमवारी धुलिवंदनाची व रंगपंचमी २ एप्रिलला ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी आल्याने सुट्टी असणार आहे. रक्षाबंधन २२ ऑगस्टला रविवारी आहे. 

सहा महिन्यांतील १९ तारखांना योगायोगाने सुट्ट्या आल्या आहेत. १९ फेब्रुवारीला शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी ‘रथसप्तमी’ आणि १९ नोव्हेंबरला शुक्रवारीच इंदिरा गांधी जयंतीच्या दिवशी गुरू नानक जयंतीची सुट्टी असणार आहे. १९ ऑगस्टला मोहरमची तर १९ ऑक्‍टोबरला ‘कोजागरी पौर्णिमेला’ ईद-ए-मिलादची सुट्टी असणार आहे. १९ सप्टेंबर व १९ डिसेंबरला रविवारची सुट्टी आहेच. त्यामुळे १९ तारीख सर्वांची आवडती ठरणार!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१० सालचे कॅलेंडर (तारीख-वार सारखे) २०२१ मध्ये आल्याने, २०१० प्रमाणेच २०२१ मध्येही, चौथ्या एप्रिल महिन्यात ४ तारखेला रविवार, सहाव्या जून महिन्यात ६ तारखेला रविवार, आठव्या ऑगस्ट महिन्यात ८ तारखेला रविवार, दहाव्या ऑक्‍टोबर महिन्यात १० तारखेला रविवार व बाराव्या डिसेंबरमध्ये १२ तारखेला रविवार असणार आहे. १ मे, २ ऑक्‍टोबर व २५ डिसेंबर या एकाच वाराला येणाऱ्या व तारखेने मिळणाऱ्या तीन सुट्ट्या, २०१० प्रमाणेच २०२१ मध्येही शनिवारी असणार आहेत. प्रजासत्ताकदिन २६ जानेवारीची सुट्टीही २०१० प्रमाणे २०२१ मध्ये मंगळवारी आहे.

लॉकडाउनमध्ये कंडोमची मागणी वाढली; रात्रीच्या तुलनेत दिवसा झाला प्रचंड खप

२००२ च्या तिथी १९ वर्षांनी २०२१ मध्ये आल्याने गुढीपाडवा १३ एप्रिलला, दसरा १५ ऑक्‍टोबरला व बलिप्रतिपदा ५ नोव्हेंबरला, २००२ प्रमाणे २०२१ मध्येही असणार आहे. साडेतीन मुहुर्तांच्या या तीनही सणांना सुट्टी असतेच. अक्षय्यतृतीया (अर्धा मुहूर्त) सण १४ मे रोजी आहे.

१० दिवसांचा गणेशोत्सव १० सप्टेंबरपासून १९ सप्टेंबरपर्यंत आहे. १९ सप्टेंबरला रविवारी अनंतचतुर्दशी व शुक्रवारी १० सप्टेंबरला श्रीगणेशचतुर्थी आहे. रविवारी १२ सप्टेंबरला गौरीआवाहन असल्याने महिलावर्ग आनंदात राहील. दिवाळी १ ते ६ नोव्हेंबर दरम्यान असल्याने व्यापारीवर्ग, नोकरदार व शेतकरीराजा असे सर्वच दिवाळी साजरी करतील. गुरुवारी ४ नोव्हेंबरला नरकचतुर्दशी - लक्ष्मीपूजनाची व ५ नोव्हेंबरला शुक्रवारी बलिप्रतिपदेची सुट्टी आहे.

सावधान! लस टोचून घेण्यासाठी नंबर लावा म्हणत नोंदणीच्या नावाखाली लूट

वर्षातून ५ गुरूपुष्यामृतयोग, ५ श्रावणी सोमवार, मार्गशीर्षमधील लक्ष्मीव्रताचे ५ गुरुवार २०२१ मध्ये आहेत. २८ जानेवारी व २८ ऑक्‍टोबरला तसेच २५ फेब्रुवारी व २५ नोव्हेंबरला आणि ३० सप्टेंबरला गुरूपुष्यामृतयोग आहे. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी १६ ऑगस्टला पारसी नववर्षदिनाची सुट्टी रविवारच्या १५ ऑगस्टला जोडून आहे. १४  एप्रिलची डॉ. आंबेडकर जयंतीची सुट्टी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन दिनाच्या दिवशी असून, महाशिवरात्र ११ मार्चला आहे. रमजान ईदची सुट्टी १३ मे रोजी आहे. ३ अंगारकी चतुर्थ्या २०२१मध्ये आहेत.

Edited By - Prashant Patil