Ganpati Visarjan violence : गणपती विसर्जनावेळी राडा; पोलिसांनी डीजे जप्त केला अन् खासदारांच्या वाहनाच्या काचा फोडल्या

SP MP Pappu Nishad Ganpati Visarjan News : डीजे जप्त केल्याने विसर्जन मिरवणुकीत गोंधळ झाला. संत कबीर नगरमध्ये समाजवादी पक्षाचे खासदार पप्पू निषाद यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या.
SP MP Pappu Nishad Ganpati Visarjan News

SP MP Pappu Nishad Ganpati Visarjan News

esakal

Updated on

Ganesh idol immersion : उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे जप्त केल्याच्या कारवाईवरून मोठा गोंधळ झाला. पोलिसांच्या कारवाईचा विरोध करत संतप्त नागरिक रस्त्यावर बसले. याचदरम्यान खलीलाबादचे समाजवादी पक्षाचे खासदार लक्ष्मीकांत निषाद उर्फ पप्पू निषाद यांचे वाहन या गर्दीत अडकले. संतप्त जमावाने खासदारांच्या वाहनाला घेराव घालत तोडफोड केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खासदारांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, संत कबीर नगरमधील बखिरा येथे गणेश विसर्जनाची मिरवणूक सुरू होती. अमरदोभा चौकाजवळ मिरवणुकीतील डीजे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. डीजे वाहन पोलिस ठाण्यात नेण्यात येत असल्याचे समजल्यानंतर मिरवणुकीतील लोक संतप्त झाले आणि त्यांनी रस्त्यावर बसून पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला.

याचवेळी खासदार लक्ष्मीकांत निषाद यांचे वाहन त्या मार्गावरून जात होते. संतप्त जमावाने खासदारांच्या वाहनाला घेरले आणि त्याची तोडफोड केली. या घटनेत वाहनाची एक काच फुटल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि खासदारांना गर्दीतून सुरक्षित बाहेर काढले.

घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. एएसपी सुशील कुमार सिंह यांनी घटनास्थळी पोहोचून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गणेश विसर्जनाची मिरवणूक अमरदोभामार्गे पुढे जात होती. यावेळी पोलिसांनी मिरवणुकीसोबत असलेल्या डीजे वाहनाचे फोटो काढले आणि त्यानंतर ते वाहन ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे मिरवणुकीतील लोकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी रस्त्यावर बसून पोलिसांच्या कारवाईचा विरोध केला.

एसपी संदीप मीना यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून खासदारांच्या वाहनाला सुरक्षा देण्यात आली. सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून खासदारांच्या वाहनाला घेराव घालून तोडफोड करणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com