कोरोना लस घेण्यापूर्वी भरावं लागतं संमतीपत्र? नेमकं काय लिहिलंय यात

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 19 January 2021

- देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली- देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड आणि स्वदेशी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे. देशात आतापर्यंत तीन लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लस देण्यापूर्वी कंपनीकडून एक संमतीपत्र लिहून घेतलं जात आहे.

Farmers Protest : 'आम्ही कोर्टाकडे गेलो नव्हतो, संसदमार्गे आलेले कायदे...

संमतीपत्रात नेमकं काय लिहिलंय के बघुया...

- लस घेतल्यामुळे शरीरात अँटिबॉडिज निर्माण होतील, पण तरीही कोविड विषाणूसंबंधी सर्व त्या खबरदाऱ्या घेतल्याच पाहिजेत. 

- कोरोनाची लस घेतल्यानंतर काही दुष्परिणाम दिसून आल्यास व्यक्तीला सरकारच्या अधिकृत दवाखान्यात किंवा केंद्रात आणि सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली योग्य ते उपचार दिले जातील.

- लशीमुळे काही गंभीर परिणाम झाल्यास आणि ते सिद्ध झाल्यास कंपनी आवश्यक ती भरपाई करेल. केंद्रीय नीतिशास्त्र समिती ही नुकसान भरपाई निश्चित करते.

- कोरोना लस घेणाऱ्यांची आरोग्याची स्थिती आणि लस दिल्यानंतरती स्थिती दोन्ही तपासले जातील. लस दिल्यानंतर सात दिवसात काही दुष्परिणाम झाले नाहीत, याची खातरजमा करण्यासाठी व्यक्तीवर निगराणी ठेवली जाईल. चार आठवड्यांनी कोरोनाचा दुसरा डोस दिला जाईल.  

काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याची राम मंदिराला देणगी; PM मोदींना लिहिलं खास...

- कोरोना विषाणूवर मात करता येईल, यासाठी लशीची चाचणी घेतली जात आहे. लस देताना व्यक्तीची घेतलेली माहिती गुप्त ठेवण्यात येईल आणि या माहितीचा गैरवापर किंवा पूनर्वापर केला जाणार नाही याची हमी संमतीपत्रात देण्यात आली आहे.

- लस देणाऱ्याने लस घेणाऱ्याची पूर्व चौकशी करायची आहे आणि यासाठी त्यांनी संबधित व्यक्तीला नऊ प्रश्न विचारायचे आहेत. या प्रश्नांची यादी संमती पत्रात देण्यात आली आहे. लस 18 वर्षांखालील व्यक्ती, गरोदर महिला, बाळाला दुध पाजणाऱ्या माता यांना देणार नाही, अशी अट देण्यात आली आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूशी सुरु असलेल्या लढाईला आता निर्णायक वळण आले आहे. गेल्या 16 जानेवारीपासून देशात लसीकरणास सुरवात झाली आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या दिवशीही लसीकरण मोहिम सुरु आहे. आतापर्यंत देशात एकूण 3 लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली गेली आहे.    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: before gating corona vaccine you should fill form bharat biotech