
Gautam Gambhir Death Threat: भारताच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला "ISIS-काश्मीर" या दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. गंभीरला २२ एप्रिलला एक दुपारी आणि दुसरा संध्याकाळी "IKillU" असा संदेश असलेले दोन ईमेल मिळाले,. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर या धमक्या देण्यात आल्या. या हल्ल्याचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला आहे.