Germany Legaliz cannabis : या देशांनी गांजाला दिली कायदेशीर मान्यता , पण जर्मनीने उचललेलं सर्वाधिक धोकादायक पाऊल !

नव्या प्रस्तावाप्रमाणे तरुण गांजाची लागवड करू शकतात
Germany Legaliz cannabis
Germany Legaliz cannabisesakal

Germany Legaliz cannabis : जर्मन सरकारचं म्हणणं आहे की, नव्या प्रस्तावाप्रमाणे तरुण गांजाची लागवड करू शकतात. जर्मनीच्या या नव्या प्रस्तावावर टीका सुरू आहे. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे? बऱ्याच देशांमध्ये गांजाचा वापर कायदेशीर करण्यात आला आहे. आणि यात आता जर्मनी देखील सहभागी झाला आहे.

जर्मन सरकारने नुकतेच गांजा कायदेशीर करण्यासाठी एक विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकानुसार गांजाच्या वापरासोबत त्याची लागवडही करता येणार आहे. आतापर्यंत युरोपियन देशांमध्ये गांजासाठी सर्वाधिक सूट देण्यात आली आहे. जगातील डझनभर देशांमध्ये गांजाच्या वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. परंतु जेव्हापासून जर्मनीमध्ये कायदेशीर मान्यता देण्यात आली तेव्हापासून त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

Germany Legaliz cannabis
Relationship Tips : या गोष्टी परफेक्ट असतील तर तुमचं नातं कधीच तुटणार नाही!

जर्मन सरकारने संसदेत प्रस्ताव मांडला आहे की, कॅनाबिस क्लबचा भाग झाल्यानंतर एखादा प्रौढ व्यक्ती 25 ग्रॅम गांजा बाळगू शकतो आणि त्याची तीन रोपे वाढवू शकतो. अशा परिस्थितीत जगातील कोणत्या देशांनी गांजाला कायदेशीर मान्यता दिली आहे, या मान्यतेमागे काय कारणं होती, जर्मनीच्या प्रस्तावात असं काय आहे, ज्यावर टीका होत आहे, जाणून घेऊ

Germany Legaliz cannabis
Meal Tips जेवण नीट न चावताच गिळताय, मग आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक

जगातील या देशांमध्ये आहे गांजाला कायदेशीर मान्यता

जगातील अनेक देशांनी गांजा गुन्हेगारीच्या कक्षेबाहेर ठेवला आहे, परंतु अनेक अटींसह त्याचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. मान्यता देणाऱ्या देशांमध्ये अर्जेंटिना, बार्बाडोस, चिली, कोस्टा रिका, क्रोएशिया, सायप्रस, डेन्मार्क, झेक प्रजासत्ताक, इक्वेडोर, फिनलंड, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, जमैका, न्यूझीलंड, पनामा, जमैका, पेरू, पोलंड, पोर्तुगाल आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे.

Germany Legaliz cannabis
Face Care Tips : चेहऱ्यावरील डागांचा थर केशर करेल छुमंतर; हे फेसपॅक घरीच बनवा चेहरा नक्की उजळेल!

इथे गांजाच्या मंजुरीसाठी अनेक कारणे देण्यात आली आहेत. जसे- त्यांचा औषधांमध्ये वापर करणे आणि संशोधनात वापरणे. तीव्र वेदना, कर्करोग आणि पार्किन्सन रोग यांसारख्या आजारांमध्ये वापरता यावा म्हणून गांजाला मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय अनेक देशांमध्ये गांजाला मान्यता देताना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तो विकत घेणे बेकायदेशीर मानले जाईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. तथापि, बहुतेक देशांतील लोक ते सामान्यपणे वापरू शकत नाहीत. ही सूचना येथील कायद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे, परंतु जर्मनीच्या बाबतीत तसं नाहीये.

Germany Legaliz cannabis
Tips For Black Magic: घरावर कोणी लिंबू फिरवलाय का? वास्तू देत असलेले हे संकेत वेळीच ओळखा!

अनेक देशांमध्ये कायदेशीर असताना जर्मनीमध्ये वाद का?

जर्मन सरकार गांजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी कायदा का आणत आहे, यामागचा तर्क समजून घ्या. जर्मन सरकारचे म्हणणे आहे की नवीन प्रस्तावात तरुणांच्या गांजाच्या वापराच्या प्रमाणावर मर्यादा घालण्यात आली आहे. ते गांजाची झाडे देखील वाढवू शकतील. निवडक शहरांमध्ये गांजा विक्रीचा परवाना दिला जाईल. ते फार्मसीमधून विकत घेण्याऐवजी, स्वतः त्याचे रोप देखील वाढवू शकता.

Germany Legaliz cannabis
Health Tips : मधुमेह असलेल्यांना भात खाण्याची योग्य पद्धत माहितीच नाहीय? म्हणून तर आजार वाढतच चाललाय

यामुळे औषधांचा काळाबाजार थांबेल, गुन्ह्यांची संख्या कमी होईल असे जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. शिवाय नव्या कायद्यामुळे अवैध व्यापाऱ्यांवर कडक कारवाई होईल, लोकांना गांजाशी संबंधित भेसळयुक्त पदार्थ वापरावे लागणार नाहीत असा युक्तिवाद केला जातोय. मात्र, या युक्तिवादांवर टीका होत आहे. यामुळे गुन्हे थांबण्याऐवजी वाढू शकतात, असे जर्मन न्यायाधीशांच्या गटाचे म्हणणे आहे. यामुळे न्यायव्यवस्थेवरचा भार वाढू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com