Positive Story : एक महिन्याच्या लेकीला घेऊन कामावर हजर झाल्या SDM साहिबा

वृत्तसंस्था
Tuesday, 13 October 2020

महामारीच्या या भीषण काळात जेथे बऱ्याच अधिकाऱ्यांनी स्वत:ला लोकांपासून दूर ठेवले आहे, तिथे सौम्या पांडे यांनी आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत आपली जबाबदारी समजून कामावर हजर झाल्या आहेत.

गाजियाबाद : गेल्या सात-आठ महिन्यांपासून देश कोरोना व्हायरस या महामारीविरुद्ध झुंज देत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले.

MPSCने कसली कंबर; नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीची तयारी अंतिम टप्प्यात

कोरोनामुळे आरोग्य आणि पोलिस प्रशासनावर मोठी जबाबदारी पडली होती. कोरोनाला घाबरून या दोन्ही क्षेत्रातील अनेक डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी एकतर रजा घेतली होती किंवा राजीनामा देणे पसंत केले होते. मात्र, गाझियाबादच्या उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम)ने एक मोठे उदाहरण उभे केले आहे. 

IAS सौम्या पांडे या गाझियाबादमधील मोदीनगर येथे एसडीएम म्हणून कार्यरत आहेत. या कोरोना काळात त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. प्रसूतीनंतर त्यांना प्रसूती रजेचा पूर्ण हक्क असतानाही त्यांनी फक्त एक महिन्याची प्रसूती रजा घेतली होती. आणि त्यानंतर त्या कामावर परत आल्या आहेत. 

'पार्ले जी' कंपनीचा जाहिरातींबाबत मोठा निर्णय; सोशल मीडियावर प्रचंड कौतुक

महामारीच्या या भीषण काळात जेथे बऱ्याच अधिकाऱ्यांनी स्वत:ला लोकांपासून दूर ठेवले आहे, तिथे सौम्या पांडे यांनी आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत आपली जबाबदारी समजून कामावर हजर झाल्या आहेत. कामावर येताना त्या आपल्या एक महिन्याच्या लेकीलाही घेऊन येत आहेत. त्यामुळे आई आणि प्रशासकीय अधिकारी या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या पांडे यांचे सगळीकडे कौतुक होत आहे. 

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया देशभरात राबविण्यात येत आहे. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक क्षेत्र पुन्हा रुळावर येऊ लागले आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. आरोग्य क्षेत्र आणि प्रशासनावरील जबाबदारी कमी झालेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghaziabad SDM Saumya Pandey returns to work after one month of Maternity leave