
आईच्या प्रेतासोबतच 'ती' राहत होती; अंगावर काटा आणणारी घटना
अचानक एक दिवस शेजाऱ्यांना एका घरातून कुबट वास येऊ लागला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस आले आणि दार उघडताच जे दिसलं, त्याने पोलिसांच्या अंगावरही काटा आला. (Girl Found leaving with her mother's dead body)
हा प्रकार घडलाय लखनौमधल्या इंदिरा नगर भागात. २६ वर्षीय अंकिता दिक्षित आपल्या आईच्या प्रेतासोबतच राहत होती. आईचं प्रेत एका खोलीत पडलं होतं, तर ती दुसऱ्या खोलीत होती. अंकिताने आपल्या आईच्या मृत्यूबद्दल तिच्या नातेवाईकांनाही काहीही सांगितलं नव्हतं. जेव्हा शेजाऱ्यांना कुबट वास येऊ लागला, तेव्हा त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलीस आल्यावर त्यांना ही मुलगी आणि तिच्या आईचा मृतदेह सापडला. (Lucknow crime news)
हेही वाचा: Crime : पत्नीच्या डोक्यात फावड्याने वार करून खून करणारा जेरबंद
मृत आईचं नाव सुनीता दिक्षित असं आहे. त्या हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड या कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचा पती राजनाथ दिक्षित याच्याशी १० वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. घरामध्ये फक्त आई आणि मुलगी दोघीच राहत होत्या आणि सुनीता यांना कॅन्सर झाला होता. जेव्हा पोलीस त्यांच्या घरात आले, तेव्हा मुख्य दार बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पण त्यांना महिलेचा आवाज येत होता. पोलिसांनी दार ठोठावलं, तेव्हा अंकिताने दार उघडलं नाही, पण तिने आरडाओरडा करायला सुरुवात केला. तेव्हा पोलिसांनी ते दार तोडलं.
हेही वाचा: Crime Alert : खुनाच्या सत्राने हादरले नाशिक
आत गेल्यावर त्यांनी पाहिलं की एका खोलीत अंकिता होती, तर दुसऱ्या खोलीत तिच्या आईचा मृतदेह होता. अंकिताची मानसिक अवस्था ठीक नाही, अशी माहितीही यावेळी मिळाली. सुरुवातीला अंकिताला काहीच बोलता येत नव्हतं. पण नंतर थोडी विचारपूस केल्यानंतर तिने आपली ओळख सांगितली. हा मृतदेह दहा दिवस जुना असल्याचं समोर आलं. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणातली पुढची कारवाई केली जाईल.
Web Title: Girl Stays Home For Over 10 Days With Mothers Corpse Without Informing Family
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..