प्रेयसीने मध्यरात्री फोन करून बोलावले अन् फसला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

प्रेयसीने मध्यरात्री फोन करून प्रियकराला घरी बोलावले. प्रियकर घरी आला पण तिच्या कुटुंबियांनी पाहिले. प्रियकराला बांधून चार दिवस मारहाण करत राहिल्याची घटना येथे घडली आहे.

बरनाला (पंजाब): प्रेयसीने मध्यरात्री फोन करून प्रियकराला घरी बोलावले. प्रियकर घरी आला पण तिच्या कुटुंबियांनी पाहिले. प्रियकराला बांधून चार दिवस मारहाण करत राहिल्याची घटना येथे घडली आहे.

जगाचा निरोप घेऊ म्हटल्यावर एकटाच पळाला...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन सिंह याचे गावामधील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच्या मैत्रिणीने मध्यरात्री फोन करून त्याला घरी बोलावले. जीवन मैत्रिणीच्या घरी गेला. पण, तिच्या कुटुंबियांनी दोघांना पाहिल्यानंतर त्याला एका खोलीत बांधले. मैत्रिणीच्या कुटुंबियांनी त्याला चार दिवस बेदम मारहाण केली. जीवन गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबात पुढील तपास सुरू आहे.

तिने फक्त एकदाच सांगावं माझ्यावर प्रेम नाही...

जीवन सिंहचे वडील अजैब सिंह यांनी सांगितले की, 'जीवनला दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. लोखंडी गजाने त्याला मारहाण केली जात होती. आम्हाला जर कळले नसते तर त्यांनी त्याला मारून टाकले असते. त्यांच्या तावडीतून सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी आरोंपीवर कडक कारवाई करावी.'

युवतीने रडत-रडत लिहीले वडिलांना पत्र; प्रेमात फसले...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girlfriend family beat up boyfriend fiercely at punjab