

Union Minister Hardeep Singh Puri addressing rising global oil prices and India’s strategy to protect consumers amid the Middle East crisis.
esakal
Government Clarifies Rumors on Lockdown : मध्यपूर्वेतील संकटामुळे तेलाच्या किमतींबाबत जगभरात मोठी खळबळ उडाली आहे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरतेलाच्या किमतींमधील वाढीबाबत अपडेट माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, गेल्या एका महिन्याच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत; त्या प्रति बॅरल सुमारे ७० डॉलरवरून वाढून १२२ डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत. परिणामी, जगभरातील ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. आग्नेय आशियाई राष्ट्रांमध्ये किमती सुमारे ३०-५० टक्क्यांनी, उत्तर अमेरिकन देशांमध्ये ३० टक्क्यांनी, युरोपमध्ये २० टक्क्यांनी आणि आफ्रिकन राष्ट्रांमध्ये ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.