Fair And Lovely मध्ये आला Glow; कंपनीने दिलं नवं नाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 जुलै 2020

Fair & Lovely ही क्रीम फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही मोठ्या प्रमाणात वापरत होते. आता याचं फेअर अँड लव्हलीमधील फेअर शब्द काढून टाकण्यात आला आहे.

नवी दिल्ली - गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेल्या फेअर अँड लव्हली क्रिमच्या नावात असलेल्या फेअर शब्दावरून वाद निर्माण झाला होता. त्याविरोधात याचिकाही दाखल करण्यात आली होती. फेअर शब्दातून रंगभेद केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर कंपनीने फेअर अँड लव्हली मधून फेअर शब्द काढून टाकणार असल्याची घोषणा केली होती. आता कंपनीने फेअर शब्दाऐवजी ग्लो हा शब्द वापरला आहे. प्रोडक्टच्या जाहीरातीमधून गोरेपणा फोकस केला जात होता. त्यातून रंगभेद होत असल्याची टीका करण्यात आली होती. 

Fair & Lovely ही क्रीम फक्त महिलाच नव्हे तर पुरुषही मोठ्या प्रमाणात वापरत होते. आता याचं फेअर अँड लव्हलीमधील फेअर शब्द काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी यापुढे ग्लो अँड लव्हली असा शब्द वापरला जणार असल्याचं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे. 

हे वाचा - केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले,'काळजी करण्याची गरज नाही, लवकरच होणार एक कोटी...'

वर्णभेदावरून वाद निर्माण झाल्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अँड लव्हली ब्रँडचे नाव बदलले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी असलेल्या क्रीमच्या नावांमध्ये बदल करण्यात आला आहे. पुरुषांसाठी असलेल्या स्कीन क्रीमचे नाव ग्लो अँड हँडसम असं ठेवलं आहे. कंपनीने क्रीमचं नाव बदलणार असल्याचं गेल्याच महिन्यात जाहीर केलं होतं. 

हे वाचा - मनात कोरोनाची भिती असेल तर सरकारने तुमच्यासाठी घेतलाय मोठा निर्णय

हिंदुस्तान युनिलिव्हरने 1975 साली फेअर अँड लव्हली क्रीम बाजारात आणली होती. यात रंग उजळवणारी क्रीम म्हणून त्याची जाहीरात केली गेली. क्रीमच्या नावात असलेल्या फेअर शब्दामुळे गोरा रंग आणि उजळपणा यावर भर दिला जातो आणि त्यातून वर्णभेद होत असल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात गेल्या काही वर्षांपासून न्यायालयातही लढा सुरु होता. अखेर कंपनीने ब्रँडचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 

हे वाचा - रेल्वेच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं ते लॉकडाऊनमध्ये झालं

पार्श्वभूमी काय?
अमेरिकेत एका श्वेतवर्णीय पोलिसाच्या मारहाणीत कृष्णवर्णीय जॉर्ज प्लॉईड, या व्यक्तीचा दुदैवी मृत्यू झाला. या एका घटनेनं अमेरिकेत आंदोलनाचा आगडोंब उसळला. कृष्णवर्णीयांनी रस्त्यावर येत, वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवला. या आंदोलनाचे लोण संपूर्ण देशात पसरले आणि जगभरातही काळे आणि गोरे वादावर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर याविषयावरून मोठी चर्चा झाली. टीव्ही चॅनेल्सनेही या विषयावर चर्चा आयोजित केल्या होत्या. परिणामी भारतातही फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर टीका सुरू झाली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी फेअर अँड लव्हली या क्रीमच्या नावातून फेअर नाव हटविण्याची घोषणा करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: glow and lovely new name for skin cream after remove fair