गोव्याच्या सत्तासूत्रधारांना ‘दुसरा पर्रीकर’ झेपला नाही

पर्रीकरांनंतर सध्या गोव्यात सत्तेची सूत्रे हातात घेऊन बसलेल्या घटकांना ‘दुसरा पर्रीकर’ निर्माण करायचा नाही, हे या राजकीय नाट्यातले खरे वास्तव
Utpal Parrikar
Utpal Parrikarsakal

राष्ट्रीय राजकारणात गाजलेले दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर भाजपच्या उमेदवारीसाठी याचना करतोय असे चित्र निर्माण झाले आहे. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) पणजीत लढले तर त्यांचा पराभव अटळ आहे, हे सुद्धा वास्तव आहे परंतु तेवढ्यासाठीच त्यांना तिकीट नाकारले जात आहे का? पर्रीकरांनंतर सध्या गोव्यात सत्तेची सूत्रे हातात घेऊन बसलेल्या घटकांना ‘दुसरा पर्रीकर’ निर्माण करायचा नाही, हे या राजकीय नाट्यातले खरे वास्तव आहे.

Utpal Parrikar
भाजपात बंडखोरीचे सूर; दहा नेत्यांची तिकीटे कापली

उत्पल पर्रीकर पणजीत जिंकून येऊ शकत नाहीत हे ‘सत्य’ भाजपने आपल्या सर्वेक्षणातून शोधून काढले. गृहमंत्री अमित शहा यांनी यंत्रणा कामाला लावून त्या वास्तवावर मोहोर उमटवली. परंतु पर्रीकर असताना असा सर्व्हे केला असता तरीही तेच सत्य त्यांच्या हाती लागले असते. तेव्हा मात्र मनोहर पर्रीकरांना उमेदवारी नाकारण्याचे धैर्य भाजपला झाले असते का? पणजीत २३ टक्के कॅथलिक मतदार आहेत त्यांची काही मते पर्रीकरांना मिळत त्याचप्रमाणे २० टक्के सारस्वत मतांवरही त्यांची मदार असे. या मतदारसंघात बहुजन समाजाची आठ हजार मते आहेत. हे सर्व मतदार पर्रीकरांना अनुकूल होते का? तर नाही. पर्रीकरांनी मतदारांचा लोकानुनय कधी केला नाही परंतु आपल्या विरोधात बाबूश मोन्सेरात किंवा त्यांच्यासारखा आणखी प्रबळ उमेदवार उभा राहणार नाही, याची खबरदारी ते घेत असत.

Utpal Parrikar
अनिल देशमुख गौप्यस्फोट | परमबीर माझ्यासमोर थरथर कापत होते

हा बदलाचा अर्थ

उत्पल पर्रीकर यांना तिकीट नाकारणे याचा दुसरा अर्थ मनोहर पर्रीकरांचे राष्ट्रीय अस्तित्व संपविणे असाही आहे. देशातील कोणत्याही नेत्याच्या पुत्राच्या नशिबी अशी अवहेलना आली नसेल. वास्तविक उत्पल पर्रीकरांनी साधे स्वप्न बाळगले होते ते आमदार बनण्याचे. या पार्श्वभूमीवर वर्षभरापूर्वी एक रणनीती आखून पणजीमध्ये उत्पल यांना स्थानापन्न करणे भाजप नेत्यांना सहज शक्य होतं तसे वचन त्यांना दिले होते त्यामुळे भाजपच्या मूळ विचारधारेची मंडळीही अनुकूल बनली असती परंतु पणजीसह तिसवाडी तालुक्यातील मोन्सेरात यांचा प्रभाव भाजपला अधिक महत्त्वाचा वाटला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ‘दुसरा पर्रीकर’ जोखमीचा वाटला. हाच या बदलाचा अन्वयार्थ आहे.

Utpal Parrikar
'अमर जवान ज्योती' होणार राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलिन

...अन् मोन्सेरात पावन झाले

२०१२ च्या निवडणुकीत पर्रीकर ५५०० च्या मताधिक्याने जिंकून आले. इतर वेळी ते १२०० ते १४०० च्या फरकाने जिंकून येत होते. यावरून हा मतदारसंघ गृहीत धरता येत नाही हे सिद्ध होते. जिंकण्याचा निकष लावून भाजपने यावेळी ज्यांना पणजीमध्ये उमेदवारी दिली आहे, ते बाबूश मोन्सेरात वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. पर्रीकरांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मोन्सेरात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी भाजपच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोन्सेरात यांना ‘कलंकित व्यक्तिमत्त्व’ असे संबोधले होते. पुढे याच मोन्सेरात यांच्यासह त्यांची पत्नी जेनिफर तसेच काँग्रेस- महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून १३ जणांना भाजपत पावन करून घेण्यात आले.

रा. स्व. संघाची जुनी फळी नाराज

आजच्या यादीत जिंकण्याचा निकष लावल्यामुळे आयात केलेले चेहरेच अधिक दिसत आहेत. कारण सत्तेवर तेच आहेत आणि भाजपने त्यांच्यापुढे तत्त्वे गहाण ठेवल्याचा आरोप खुद्द संघाचे जुने कार्यकर्ते करू लागले आहेत. या यादीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांनी गोव्यात भाजपचे रोप लावले ते संघपठडीतील नेते श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर व मनोहर पर्रीकर यांची गोव्याच्या राजकारणातील सद्दी संपली असल्याचे बदललेल्या भाजपने दाखवून दिले.

- राजू नायक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com