कॅनडातून आणली शतकापूर्वी चोरलेली मुर्ती; अन्नपुर्णा देवीची वाराणसीत होणार पुनर्स्थापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅनडातून आणली शतकापूर्वी चोरलेली मुर्ती; अन्नपुर्णा देवीची वाराणसीत होणार पुनर्स्थापना

कॅनडातून आणली शतकापूर्वी चोरलेली मुर्ती; अन्नपुर्णा देवीची वाराणसीत होणार पुनर्स्थापना

नवी दिल्ली : अन्नपुर्णा देवीची दुर्मिळ मुर्ती वाराणसीमधून सुमारे 100 वर्षांपूर्वी चोरी करण्यात आली होती. अत्यंत दुर्मिळ अशी ही मुर्ती नुकतीच कॅनडामधून पुन्हा एकदा मिळवण्यात आली आहे. या मुर्तीची प्रतिष्ठापना आता पुन्हा एकदा मोठ्या धुमधडाक्यात काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती स्वत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 नोव्हेंबर 2020 च्या 'मन की बात'मध्ये दिली होती. या मुर्तीची प्रतिष्ठापना आता येत्या 15 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानात हवे दहशतवादमुक्त सरकार; भारताच्या पुढाकाराने बैठक

मन कि बात मध्ये बोलताना मोदी म्हणाले होते की, आज मी सर्वांना एक आनंदाची बातमी देणार आहे. ही बातमी ऐकून प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटेल. देवी अन्नपूर्णाची एक खूप जुनी मूर्ती भारतातून चोरण्यात आली होती. ती 1913 साली वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मात्र, ती परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे तसेच कॅनडा सरकारचे मी आभार मानतो.

केंद्र सरकारने प्राप्त केलेली ही मुर्ती आता उत्तर प्रदेश सरकारकडे आज गुरुवारी एका कार्यक्रमाद्वारे दिल्लीमध्ये सुपूर्द करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते काशी विश्वनाथाच्या मंदिरात या मुर्तीला पुनर्स्थापित करुन लोकार्पण करण्यात येणार आहे.

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

ही मुर्ती उंचीने 17 सेंटीमीटर आहे, तिची रुंदी 9 सेंटीमीटर आहे तर तिची जाडी 4 सेंटीमीटर आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 नंतर मोदींच्या सत्ताकाळात 42 दुर्मिळ वारसा कलाकृती देशात परत आणण्यात आल्या आहेत. तर 1976 ते 2013 दरम्यान केवळ 13 दुर्मिळ मुर्ती आणि चित्रे भारतात परत आणण्यात आली होती.

सध्यातरी, 157 शिल्पे आणि चित्रे परदेशात असल्याचं ओळखण्यात आलं आहे. त्यांना परत भारतात आणण्यासंदर्भात या देशांची वेगवेगळ्या आघांड्यावर चर्चा सुरु आहे. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम देशांमधून या दुर्मिळ वस्तू आणण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. तसेच अमेरिकेतून 100 मुर्ती भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

loading image
go to top