
पंतप्रधान कार्यालयातील 'गोडसे भक्तां'नी माझ्या अटकेचा कट रचला - मेवाणी
नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात (PMO) बसलेल्या काही गोडसे भक्तांनी माझ्या अटकेचा कट रचला असा गंभीर आरोप गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Meavni) यांनी केला आहे. आसाममधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर दोन दिवसांनंतर त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. आपल्याविरोधात रचलेला हा पूर्वनियोजित कट असल्याचा दावाही त्यांनी केला. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना उद्ध्वस्त आणि बदनाम करा, हा भाजपचा उद्देश असल्याचंही मेवाणी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले आहेत. (Godse bhakts in PMO Jignesh Mevani lashed out BJP and PM Narendra Modi)
हेही वाचा: ''मला सुद्धा धक्का होता, की...'', अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
यावेळी पुष्पा या सिनेमातील डायलॉग मारत मेवाणी म्हणाले, "मी अशा दबावाला बळी पडणार नाही. "मी फायर आहे फ्लॉवर नाही" असं ते म्हणाले. माझ्या फोन आणि लॅपटॉपमध्ये एखादं हेरगिरीचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवण्यात आल्याची शक्यता असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. मेवाणी यांचा आणि टीमचे फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत"
हेही वाचा: "त्यावेळी गोधडी ओली करणाऱ्यांनी तर..."; शेलारांचा राऊतांवर घणाघात
गुजरातमध्ये प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या २२ घटना घडल्या आहेत. पण यातील एकाही प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही किंवा या प्रकरणाची चौकशीही झालेली नाही. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर आढळून आलेल्या प्रचंड मोठ्या ड्रग्ज साठ्याची चौकशी झाली नाही. तसेच एका गुजरातच्या मंत्र्यानं दलित महिलेवर केलेल्या बलात्काराचा आरोपांप्रकरणी अटकही झालेली नाही. इथल्या धर्मसंसदेत एका विशिष्ट समाजाच्या नरसंहाराची हाक देण्यात आली. पण त्यावरही कोणती कारवाई झाली नाही, असंही मेवाणी यांनी यावेळी सांगितलं.
हेही वाचा: स्वयंघोषित महाराज कालिचरण पुन्हा बरळला; म्हणाला...
दरम्यान, माझं ट्विट हे साधा प्रश्न विचारणारं होतं. मी पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की, त्यांनी शांतता आणि एकोपा राखावा. पण माझ्या या ट्विटसाठी मला अटक करण्यात आली. यावरुन काय दिसतंय? मला उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेला हा पूर्वनियोजित कट होता. मला एफआयआरची कॉपीही देण्यात आली नाही. माझ्यावर कुठल्या कलमांखाली गुन्हा दाखल केला याची मला माहितीही दिली गेली नाही. मला माझ्या वकिलांशीही बोलू दिलं गेलं नाही. माझं आमदार म्हणून विशेषाधिकारांचा भंग करण्यात आला. गुजरातच्या विधीमंडळाच्या स्पीकरलाही माझ्या अटकेची माहिती दिली गेली नाही. उलट मला आसाममध्ये नेण्यात आली एक दिवस कोठडीतही ठेवण्यात आलं. यामुळं गुजरातच्या स्वाभिमानाला धक्का बसला आहे. याबद्दल गुजरात सरकारलाही लाज वाटायला हवी.
हेही वाचा: मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात;'या' आजारानं आहेत त्रस्त, जाणून घ्या हेल्थ अपडेट
अपक्ष आमदार असलेल्या मेवाणी यांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना आसाम पोलिसांनी २० एप्रिल रोजी गुजरातच्या बंसकन्था जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी गुवाहाटी इथं नेण्यात आलं. एका भाजप नेत्यानं आसाममधील कोकराझर जिल्ह्यात मेवाणींविरोधात पंतप्रधानांविरोधात ट्विट केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. दरम्यान २५ एप्रिल रोजी मेवाणींना जामीन मिळाला.
Web Title: Godse Bhakts In Pmo Jignesh Mevani Lashed Out Bjp And Pm Narendra Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..