esakal | मास्क वापरा अन् जीव वाचवा, गुगल डूडलद्वारे कोरोनाबाबत जनजागृती
sakal

बोलून बातमी शोधा

google spread awareness about corona through doodle nagpur news

देशातील दहा कोरोना हॉटस्पॉटपैकी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या समावेश आहे. तरीही लोकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियामांबद्दल वारंवार सांगावे लागत आहे. देशातील कोरोनाची स्थिती पाहून आज गुगल डूडलने देखील मास्कचे महत्व सांगत प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे असल्याचा संदेश डूडलवरून दिला आहे.

मास्क वापरा अन् जीव वाचवा, गुगल डूडलद्वारे कोरोनाबाबत जनजागृती

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून कोरोनाने भारतात पाय पसरण्यास सुरुवात केली. हळूहळू शहरांसह खेडोपाडी कोरोनाने हाहाकार माजवला. मात्र, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण कमी झाले. त्यामुळे अनेकांनी सर्व बंधनांचे उल्लंघन लग्न समारंभ असतील किंवा कुठले सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले. हजारोने लोकांची उपस्थित होती. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. देशातील दहा कोरोना हॉटस्पॉटपैकी महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांच्या समावेश आहे. तरीही लोकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियामांबद्दल वारंवार सांगावे लागत आहे. देशातील कोरोनाची स्थिती पाहून आज गुगल डूडलने देखील मास्कचे महत्व सांगत प्रत्येकाने मास्क लावणे गरजेचे असल्याचा संदेश डूडलवरून दिला आहे.

हेही वाचा - चोर पावलांनी कमी होतो शरीरातील ऑक्सिजन; पन्नाशी ओलांडलेल्या ७० टक्के कोरोना रुग्णांना...

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले. त्यात राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये दररोज चार हजारांच्यावरून कोरोनाबाधित सापडत आहेत. तसेच नागपुरातील कोरोना बाधितांचा मृत्यूदर देखील जास्त आहे. कोरोना पाय पसरवत असताना नागरिकांना मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे या सर्व कोविड प्रतिबंधक उपायांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. राज्य सरकार वारंवार लॉकडाऊनचे संकेत देत आहे. सध्या मिनीलॉकडाऊन लावण्यात आले आहे. तरीही भाजीचे दुकाने असतील किंवा रस्त्यावरची गर्दी पाहून खरंच कोरोनाची भीती संपली का? असाच प्रश्न निर्माण होतो. सध्या कोरोनाचे सावट अधिक गडद आहे. मृतदेहांना स्मशानभूमीत पोहोचविण्यासाठी शववाहिका कमी पडत आहेत. अशात नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाचा प्रसार जास्त होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गुगलने डूडलद्वारे कोरोना नियम सांगून जनजागृती केली आहे. अजूनही मास्कची आवश्यकता असून प्रत्येकाने मास्क वापरा अन् जीव वाचवा असे डूडलद्वारे सांगण्यात आले आहे. तसेच गुगलच्या प्रत्येक अक्षराला मास्क लावून त्यांनी जनजागृती केली आहे. तसेच काळजी कशी घ्यायची याबद्दल देखील सांगितले आहे.

हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

डूडलद्वारे देण्यात आलेल्या सूचना -

  • मास्क वापरा
  • गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
  • सोशल डिस्टन्सिंग अगदी अशक्यच असेल तर मास्क वापरून स्वतःच्या सुरक्षा करा
  • हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा
  • डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श करू नका
  • अस्वस्थ वाटत असेल तर घरीच राहा
  • ताप, खोकला अन् श्वास घेण्यास त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 
loading image