गोरखनाथ मंदिर हल्ला : आरोपी मुर्तझाबाबत पोलिसांचा मोठा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोरखनाथ मंदिर हल्ला : आरोपी मुर्तझाबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

गोरखनाथ मंदिर हल्ला : आरोपी मुर्तझाबाबत पोलिसांचा मोठा खुलासा

लखनऊ : उत्तर प्रदेशातील गोरखनाथ मंदिरात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अहमद मुर्तझा अब्बासीचे इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे. एवढेच नव्हे तर, मुर्तझा अब्बासीने ISIS साठी लढण्याच्या उद्देशाने 2020 मध्ये शपथ घेतली होती, असेदेखील उत्तर प्रदेश पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: राणा दाम्पत्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावरील निर्णय राखून

मुर्तझा अब्बासी सोशल मीडियाद्वारे आयएसआयएस दहशतवादी आणि प्रचार कार्यकर्ता मेहंदी मसूदच्या संपर्कात होता. मेहंदी मसूदला बंगळुरू पोलिसांनी 2014 मध्ये अटक केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून मुर्तझा सतत परदेशातील आयएसआयएसच्या लढाऊ आणि समर्थकांच्या संपर्कात होता, असे यूपी पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान, मुर्तझाने सांगितले की, त्याने इंटरनेटवर एके-47, 5-4 कार्बाइनसह अनेक शस्त्रास्त्रांबद्दल लेख वाचले होते.

हेही वाचा: औरंगाबादमधल्या 'त्या' शाखेपासून शिवसेना मराठवाड्यात पसरली आणि आज...

झाकिर नाईकचे व्हीडीओ बघायचा मुर्तजा अब्बासी

मुर्तजा हा वादग्रस्त झाकिर नाईकचे व्हिडीओ बघायचा. तो गोरखपुर येथील सिविल लाईनचा रहिवाशी असून, त्याने मुंबई २०१५ साली आयआयटीमधून केमिकल इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर दोन मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती. २०१७ पासून तो मानसिकरित्या ठिक नसल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलयं. त्याच्यावर अनेकवेळा उपचार केले गेल्याचं देखील उघड झालंय.

Web Title: Gorakhnath Temple Attack Police Says Accused Murtaza Abbasi Took Isis Oath In 2020

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttar Pradeshattacktemple
go to top