Good News : आता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींसाठी सरकारी बसगाड्या मिळणार; परिवहन मंत्र्यांची माहिती

प्राथमिक शाळा, हायस्कूलमध्ये विविध भागात सहलींचे आयोजिल्या जातात.
Government Buses
Government Busesesakal
Summary

सरकारकडून खासगी बसेसला परवानगी दिली जात नाही. यामुळे सरकारी बसेस शिवाय पर्यायही नाही.

बेळगाव : शक्ती योजनेमुळे (Shakti Yojana) राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींसाठी सरकारी बसेस उपलब्ध होत नाहीत. यासंबंधी ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेत परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांनी चारही परिवहन मंडळांना (Karnataka Transport Board) बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्याची माहिती विधानसभेत दिली.

काँग्रेस सदस्य हरीश कुमार यांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना त्यांनी माहिती दिली. नोव्हेंबर, डिसेंबर या कालावधीत राज्यभरात विद्यार्थ्यांच्या सहलींचे आयोजन केले जाते. मात्र, राज्यात शक्ती योजना सुरु असल्यामुळे बसेसची कमतरता पडत आहे. यामुळे शाळांना बसेस नाकारल्या जात आहेत.

Government Buses
शेतकऱ्यांना मोठा धक्का! उसाचा रस, सिरप, साखरेपासून तयार होणाऱ्या इथेनॉलनिर्मितीवर केंद्रानं घातली बंदी

खासगी बसेस घेऊन जायचा पर्याय त्यांच्याकडे आहे. मात्र, सरकारकडून खासगी बसेसला परवानगी दिली जात नाही. यामुळे सरकारी बसेस शिवाय पर्यायही नाही. यामुळे सरकारने बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. या प्रश्‍नावर ‘सकाळ’ने देखील आवाज उठविला.

Government Buses
Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

प्राथमिक शाळा, हायस्कूलमध्ये विविध भागात सहलींचे आयोजिल्या जातात. केवळ सरकारी बसेसचा वापर करण्याच्या सुचना असल्यामुळे या कालावधीत बसेस मिळणेही कठीण होते. त्यातच यंदा शक्ती योजना लागु झाल्यामुळे बस मिळणेही कठीण झाले आहे. परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी म्हणाले की, शैक्षणिक दौऱ्यासाठी राज्यातील चारही परिवहन महामंडळांना बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com