

NEET Re-Exam Under Tight Security; Air Force to Deliver Question Papers
sakal
नवी दिल्ली : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावर विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरल्यानंतर सरकारने आता फेरपरीक्षेच्या आयोजनासाठी संरक्षण दलांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी उच्चस्तरीय बैठक पार पडली, त्यात याबाबत चर्चा होऊन निर्णय झाला.