
सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'; पगारात होऊ शकते 40 हजारांपर्यंत वाढ
नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार असल्याचा दावा काही रिपोर्टमधून करण्यात येत आहे. यामध्ये लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात वाढ करण्यासंदर्भात विचार करत आहे. मूळ पगारात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांचा पगार 20 हजाराहून 28 हजारावर जाणार आहे. केंद्र सरकाने याविषयी अधिकृत घोषणा केली नाही पण काही मीडिया रेकॉर्डनुसार दावा केला जात आहे.
(Government Employee Salary Increment)
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजार एवढा आहे. सरकारी कर्मचारी फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 करण्यासाठी मागणी करत आहेत. यामुळे मूळ वेतनात 8 हजारांची वाढ होणार आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18 हजारांहून 26 हजारांवर पोहोचणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार जून 2017 मध्ये सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 7 हजारांनी वाढवण्यात आला होता. सर्वोच्च स्तरावरील म्हणजेच सचिवांचा पगार 90 हजार रुपयांवरून 2.5 लाख रुपये करण्यात आला होता. दरम्यान 7 व्या वेतन आयोगामध्ये बनवलेले वेतन मॅट्रिक्स हे फिटमेंट घटकावर आधारित आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका मानली जाते, त्यामुळे पगारात अडीच पटीने वाढ होते.
अशा प्रकारे तुम्हाला बंपर फायदा होईल
उदाहरणार्थ, जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळता त्याचा पगार 18,000 X 2.57 = रुपये 46,260 असेल. आणि फिटमेंट फॅक्टर जर 3.68 वर गेला तर पगार 95,680 (26000X3.68 = 95,680) रुपये असेल, म्हणजेच तुम्हाला पगारात 49,420 रुपयांचा फायदा होणार आहे. पण सरकारी कर्मचाऱ्यांची फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी सरकारने मान्य केली तरंच ही वेतनवाढ होणार आहे.