Corona : भारतात रुग्णसंख्येत घट; नव्या स्ट्रेनमुळे गृहमंत्रालयाने 31 जानेवारीपर्यंत वाढवल्या गाईडलाईन्स

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 December 2020

काल सोमवारी भारतात कोरोना व्हायरसपासून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 97,82,669 वर जाऊन पोहोचली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाने  कोरोना व्हायरसशी संबंधित गाईडलाईन्सना 31 जानेवोारी 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलंय की कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला रोखण्यासाठी कंटेनमेंटशी निगडीत  ज्या गोष्टी आधीपासून चालत आल्या आहेत त्या तशाच सुरु राहणार आहेत. गृहमंत्रालयाने म्हटलं की कंटेनमेंट झोन्सना सावधानतेने निर्धारित करणे सुरु राहिल. इथे कोविड संबंधीतील नियमांची अंमलबजावणी कडकपणे राबवली जाईल.

यासोबतच गृहमंत्रालयाने राज्यांना देखील कोविड-19 शी संबंधित गाईडलाईन्सचे कठोररित्या पालन करण्याचे आदेश दिले आहेत. गृह मंत्रालयाने म्हटलंय की, ऍक्टीव्ह आणि नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सातत्याने घट दिसून येतेय. खासकरुन ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराचा उदय झाल्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यावीच लागणार आहे. 

हेही वाचा - ब्रेकिंग न्यूजः कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या
काल सोमवारी भारतात कोरोना व्हायरसपासून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 97,82,669 वर जाऊन पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, एक महिन्याहून अधिक काळापासून दररोज नव्या बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Extends SOPs on COVID19 Surveillance Till Jan 31