
नवी दिल्ली : केंद्र सरकारनं आता OTT प्लॅटफॉर्म्ससाठी नवी अॅडव्हायजरी आणली असून या प्लॅटफॉर्मवर अश्लिल कंटेट प्रसारित केल्यास मोठी कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळं यासंदर्भातील आचारसंहितेचं कडक पालन करण्याचे निर्देश सरकारनं OTT फ्लॅटफॉर्म्सना दिले आहेत. युट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्या प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टानं केंद्राला याबाबत 'काहीतरी' करण्याचे निर्देश दिले होते, त्यामुळं केंद्रानं हे पाऊल उलचललं आहे.