
Stock Market Closing Today: गुरुवारी (20 फेब्रुवारी) देशांतर्गत शेअर बाजारात घसरणीसह व्यवहार झाला. बाजारावर सलग तिसऱ्या दिवशी दबाव होता. दिवसभर लाल रंगात व्यवहार केल्यानंतर निफ्टी 19 अंकांनी घसरला आणि 22,913 वर बंद झाला. सेन्सेक्स 203 अंकांनी घसरला आणि 75,735 वर बंद झाला. निफ्टी बँक 235 अंकांनी घसरून 49,334 वर बंद झाला.