Breaking News : ऑनलाइन मीडिया, ओटीटी फ्लॅटफॉर्मवर आता केंद्र सरकारचा अंकुश

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझान प्राइम, हॉटस्टारसारख्या ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या कंटेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असेल.​

नवी दिल्ली- देशातील डिजीटल, ऑनलाइन मीडियावर केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लक्ष राहणार आहे. केंद्र सरकारने तसा आदेश जारी केला असून देशातील ऑनलाइन चित्रपट, ऑडिओ व्हिज्युएल कार्यक्रम आणि बातम्या आणि चालू घडामोडीचा आशय पुरवणाऱ्या ऑनलाइन माध्यमांवर केंद्र सरकारचा अंकुश राहील. त्यामुळे यापुढे आता नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझान प्राइम, हॉटस्टारसारख्या ओटीटी फ्लॅटफॉर्मच्या कंटेटवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची नजर असेल. 

यापूर्वी ऑनलाइन कंटेंट, बातम्या देणाऱ्या वेबसाइट या माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत येत असत. हे मंत्रालय फक्त आक्षेपार्ह कंटेटवर नजर ठेवून असत. पण आता माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित ऑनलाइन मीडिया, वेबसाइट्स आणि ओटीटी फ्लॅटफॉर्म येणार आहेत. यामुळे यापुढे आता ऑनलाइन माध्यमावर केंद्र सरकारची नजर असणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government issues order bringing online films online news current affairs content ott under the Ministry of Information Broadcasting