Government Scheme : दोन दिवसांनी 'या' सरकारी योजनेचे नियम बदलतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Government Scheme

Government Scheme : दोन दिवसांनी 'या' सरकारी योजनेचे नियम बदलतील

Atal Pension Yojana Rules Changed : मोदी सरकारने २०१५-१६ मध्ये अटल पेंशन योजनेची सुरूवात केली होती. या योजनेचा फायदा घेऊन भविष्य सुरक्षित करू शकातात. ज्यामुळे निवृत्तीपर्यंत ५००० पर्यंत मासिक पेंशन मिळू शकते. आता सरकारने या योजनेत बरेच बदल केले आहेत.

हेही वाचा: Government job : पदवीधरांसाठी डीआरडीओमध्ये सरकारी नोकरीची संधी

काय आहेत बदल

 • १ ऑक्टोबरपासून आयकर (Income Tax) भरणारे लोक गुंतवणूक करू शकणार नाहीत.

 • त्यामुळे जर तुम्ही Income Tax भरण्यास पात्र असाल तर आजच गुंतवणूक करा नाहीतर १ तारखेपासून करता येणार नाही.

हेही वाचा: आंगणवाडी सेविकांना सरकारी नोकरी ः चंद्रकांत पाटील

अटल पेंशन योजनेचे फायदे काय

लोकांना निवृत्तीनंतर सोशल सिक्यूरिटी मिळवी म्हणून या योजनेची सुरूवात करण्यात आली होती. याची सुरूवात विशेषतः असंघटित क्षेत्रातल्या लोकांना याचा लाभ व्हावा म्हणून सुरू करण्यात आले होते. कारण संघटित क्षेत्रातल्या लोकांच्या पगाराचा एक हिस्सा पीएफमध्ये जमा होतो. त्यामुळे असंघटित क्षेत्रातल्या लोकांना ५००० रूपयांपर्यंत पेंशन मिळू शकतात.

हेही वाचा: Government job : पुढील ६ महिन्यांत होणार मोठी भरती; सरकारी नोकरीची संधी

नियमातले बदल

 • टॅक्सपेयर्स या योजनेत गुंतवणूक करू शकत नाही. जे टॅक्स भरण्यास पात्र नाहीत ही योजना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

 • याचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय १८ ते ४० दरम्यान असायला हवे.

 • या योजनेच्या लाभ धारकांना वयाच्या ६० वर्षांनंतर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे १००० ते ५००० रूपयांपर्यंत मासिक पेंशन मिळेल.

 • जर कोणत्या लाभधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला ते पैसे मिळतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

 • आधार कार्ड (Aadhaar Card)

 • वोटर आयडी कार्ड (Voter ID Card)

 • बर्थ सर्टिफिकेट (Birth Certificate)

 • सेविंग्ज बँक अकाउंट (Saving Account)

 • रजिस्टर्ड मोबाइल नंबर (Registered Mobile Number)

असे करा ऑनलाईन अप्लाय

 • ज्या बँकेचे सेव्हिंग अकाउंट आहे त्या बँकेचे नेट बँकिंग सुरू करा.

 • त्यानंतर कस्टमर सर्विस ऑप्शनवर क्लिक करून अटल पेंशन योजना फॉर्म डाउनलोड करा

 • आपले सर्व डिटेल्स भरा.

 • यात नॉमिनीचे नाव टाका.

 • त्यानंतर महिन्याला किती पेंशन पाहिजे हे निवडा. त्यानुसार तेवढे पैसे तुमच्या खात्यातून कट होतील.

 • त्यानंतर फॉर्मवर डिजिटल सही करा आणि नेट बँकिंगने हप्ते भरा.

ऑफलाइन अर्ज करण्यासाठी

यासाठी जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जावे. योजनेचे फॉर्म भरावे. वर सांगितलेल्या कागदपत्रांच्या कॉनी फॉर्मसोबत जोडा. यानंतर बँकेतून ॲक्नॉलेजमेंट रिसिट मिळेल. मग तुमच्या खात्यातून दर महिन्याला हप्त्याचे पैसे कट होणे सुरू होतील.

टॅग्स :Government schemes