योगी सरकारने जागा दाखवली, बढती मिळालेले अधिकारी पुन्हा झाले चौकीदार अन् शिपाई

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

उत्तर प्रदेशमधील माहिती आणि सूचना विभागाने जिल्हा सूचना विभागातील चार अधिकाऱ्यांना नियमबाह्य बढतीसंदर्भात कारावई केली. त्यामुळे त्याचे डिमोशन करुन त्यांना पुन्हा शिपाई, चौकीदार आणि ऑपरेटर आणि सहाय्यक पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने सरकारी कामकाजातील भ्रष्टाचारासंदर्भात मोहिमच उघडली आहे. राज्यातील माहिती आणि सूचना विभागात नियमबाह्य बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांना सरकारने त्यांची जागा दाखवली आहे. उत्तर प्रदेशमधील माहिती आणि सूचना विभागाने जिल्हा सूचना विभागातील चार अधिकाऱ्यांना नियमबाह्य बढतीसंदर्भात कारावई केली. त्यामुळे त्याचे डिमोशन करुन त्यांना पुन्हा शिपाई, चौकीदार आणि ऑपरेटर आणि सहाय्यक पदावर काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

शिपाई, चौकीदार आणि ऑपरेटर आणि सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नियमबाह्य पदोन्नती झाली होती. माहिती आणि सूचना विभागात चार जण अधिकारी पदावर काम करत होते. त्यांना आता पुन्हा एकदा  असलेल्या कर्मचाऱ्यांवरांना त्यांच्या मूळ पदावर कार्यरत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना आता अप्पर जिल्हा सूचना अधिकारी पदावरुन पुन्हा आपल्या मूळ पदावर काम करावे लागणार आहे.  

बेदी यू गो ! राज्यपाल किरण बेदींविरोधात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

नरसिंह, दयाशंकर, विनोद कुमार शर्मा आणि अनिल कुमार सिंह अशी कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. नरसिंह नावाच्या कर्मचाऱ्याला शिपाई, दयाशंकर याला  चौकीदार तर विनोद कुमार शर्मा आणि अनिल कुमार सिंह या दोघांना पुन्हा एकदा  सिनेमा ऑपरेटर कम प्रचार सहाय्यक म्हणून काम करावे लागणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP govt demotes 4 illegally promoted information officers to peon watchman