esakal | पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे 'नो आयडिया' : अनुराग ठाकूर
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag_Thakur

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९१.१७, तर डिझेल ८१.४७ रुपये प्रतिलिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ९७.५७ तर डिझेल ८८.६० रुपये प्रतिलिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे 'नो आयडिया' : अनुराग ठाकूर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

Petrol-Diesel Price hike: नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी शंभरी गाठल्याने सामान्य माणसाचं बजेट कोलमडलं आहे. त्यात गॅसच्या किंमतीही वाढल्याने त्याच्या समोरील अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणावं, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. सामान्य माणसाचा हा आवाज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचला आहे, पण त्यांनी हात वर केले आहेत. 

पेट्रोल-डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केल्यानंतर प्रति लिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमती ७५ रुपयांपर्यंत कमी होऊ शकतात, असं मत स्टेट बँकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. त्याला अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत उत्तर दिलं आहे. 

Womans Day 2021 : रुपालीच्या यशस्वी बिझनेसचा 'अंडे का फंडा'; मोठ्या पगाराच्या नोकरीला दिला नकार​

पेट्रोल-डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी तशी शिफारस जीएसटी परिषदेने करणे गरजेचं आहे, पण त्यांनी अशी कोणतीही शिफारस केली नाही, असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती ७५ रुपयांपर्यंत कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, सामान्य जनतेला अच्छे दिनांसाठी अजून काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार, हे मात्र नक्की.

पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये केल्यास त्याच्या किंमती कमी होतील, पण मोठा महसूल गमावण्याची भीती केंद्र आणि राज्य सरकारला आहे. राजकीय इच्छाशक्तीशिवाय हे शक्य होणार नाही, असं स्टेट बँकेच्या तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे. जास्त महसूल मिळत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती जास्त राहिल्याने सरकारला फायदाच फायदा होत आहे. जीएसटीमध्ये अंतर्भाव केल्यास केंद्र आणि राज्य सरकारचा ६० टक्के कराचा भार कमी होईल, अशी भीती दोन्ही सरकारला आहे. 

#LetsTalkCPPuneCity : पुणेकरांच्या प्रश्नाला पोलिस आयुक्तांचे ट्विटरवर मार्मिक उत्तर​

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑईलची प्रति बॅरल ६० रुपये पकडल्यास आणि जीएसटी लागू केल्यास पेट्रोल ७५ रुपये, तर डिझेल ६८ रुपये प्रति लिटर मिळू शकते. त्यामुळे केंद्र आणि राज्याचे सुमारे १ लाख कोटी रुपयांचा महसूल बुडू शकतो, जो जीडीपीच्या ०.४ टक्क्यांपेक्षा कमी असेल. इतका मोठा महसूल हातचा जाईल, अशी भीती वाटत असल्याने पेट्रोल-डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास दोन्ही सरकार तयार होत नाहीत. 

भाजपकडून रावत यांची अखेर गच्छंती; उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा​

फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल-डिझेलचे दरांनी उच्चांक गाठले होते. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दरांमध्ये कोणतेही बदल झाले नाहीत, पण मंगळवारी चार मेट्रो शहरांमधील तेलांच्या दरांमध्ये बदल झाले. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने २७ फेब्रुवारी रोजी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत ९१.१७ रुपयांपर्यंत वाढ केली होती. 

सध्या दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ९१.१७, तर डिझेल ८१.४७ रुपये प्रतिलिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल ९७.५७ तर डिझेल ८८.६० रुपये प्रतिलिटर आहे.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image
go to top