esakal | Vaccination I लहान मुलांचं लसीकरण; 'या' मुलांना मिळणार पहिल्यांदा लस
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

लहान मुलांचं लसीकरण; 'या' मुलांना मिळणार पहिल्यांदा लस

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : लहान मुलांसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा कोणाला लस दिली जाईल याबाबत खुलासा करण्यात आला आहे. नॅशनल इम्युनायझेशन टेक्निकल अॅडव्हाझरी ग्रुप (NTAGI) चे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांनी रविवारी ही माहिती दिली.

डॉ. अरोरा म्हणाले, "लहान मुलांच्या लसीकरणासाठी आम्ही प्राधान्यक्रम लावणार आहोत. त्यानुसार कोमॉर्बिडिटीज असलेल्या मुलांना आधी लस देण्यात येईल त्यानंतर जी मुलं सुदृढ आहेत त्यांना नंतर लस देण्यात येईल" एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: Rave Party : आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी कोठडी!

दरम्यान, ड्रग्स कन्ट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) ऑगस्टमध्ये झायडस कॅडिला या डीएनएवर आधारित लस मोठ्यांसाठी आणि १२ वर्षांवरील मुलांसाठी मंजुरी दिली होती. आता ही लस भारतातील राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत समाविष्ट होण्याच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचा: भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

जून महिन्यात WHO-AIIMS यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात हे दिसून आलं होतं की, १८ वर्षांखालील ५५.७ टक्के मुलांमध्ये तसेच १८ वर्षांवरील ६३.५ टक्के मुलांना कोविडची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. ZyCoV-D ही सुईशिवाय देण्यात येणारी लस असून अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीनं ती तयार केली आहे. आत्तापर्यंत केवळ याच लसीला १२ ते १८ वयोगटातील मुलांच्या आपत्कालीन लसीकरणासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

loading image
go to top