Republic Day : हवाई दलाच्या ग्रँड फ्लाय-पास्ट 75 विमानांच्या प्रात्यक्षिकांसह पथसंचलनाचा समारोप

Republic Day : हवाई दलाच्या ग्रँड फ्लाय-पास्ट  75 विमानांच्या प्रात्यक्षिकांसह पथसंचलनाचा समारोप

Republic Day: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला. यंदाचा सोहळा खास होता कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांची सुरुवात युद्ध स्मारकावरील श्रद्धांजली झाली आणि हवाई दलाच्या ग्रँड फ्लाय-पास्ट 75 विमानाच्या प्रात्यक्षिकांसह पथसंचलनाचा समारोप झाला.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांचे स्मारक असलेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आदरांजली वाहिली. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सेना प्रमुखही उपस्थित होते.

राजपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले.

राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक प्रदान करण्यात आले.

कडाक्याच्या थंडीमध्येही दिल्लीतील राजपथावर प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.भारताच्या प्रजासत्ताक दिनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध राज्यांच्या चित्ररथांनी देशवासीयांचे लक्ष वेधले. प्रजासत्ताक दिनी सोहळ्यात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा चित्ररथ प्रथमच सहभागी झाला होता. यांनी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना UDAN दर्शविले.

यूपीच्या चित्ररथामध्ये याद्वारे राज्य सरकारच्या नवीन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग धोरण आणि औद्योगिक विकास धोरणावर आधारित 'एक जिल्हा एक उत्पादन'द्वारे कौशल्य विकास आणि रोजगार काशी विश्वनाथ कॉरिडॉरमधील विकासाचेही प्रदर्शन करण्यात आले.

'स्वातंत्र्य लढ्यात पंजाबचे योगदान' दर्शविणारी, राज्याचा चित्ररथामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे प्रतिकृती सादर केली होते. यात लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखालील सायमन कमिशन आणि मायकल ओडवायर यांच्यावर उधम सिंग यांनी केलेल्या निषेधाचेही सादरीकरण केले होते.

- 'खेळात प्रथम क्रमांक' या थीमवर आधारित, हरियाणाचा चित्ररथ पथसंचलामध्ये सहभागी झाला होता. टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने जिंकलेल्या 7 पदकांपैकी 4 पदक हरियाणाने जिंकले. त्याचप्रमाणे पॅरालिम्पिक 2020 मध्ये देशाने जिंकलेल्या 19 पदकांपैकी 6 पदक हरियाणाच्या खेळाडूंना मिळाले.

प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान राजपथावर अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि जम्मू आणि काश्मीरचे चित्ररथाचे सादर केले होते.

प्रजासत्ताक सोहळ्यात गोव्याच्या चित्ररथामध्ये, 'गोवन हेरिटेजची चिन्हे' या थीमवर आधारित होती. यामध्ये अगुआडा किल्ला, पणजीतील आझाद मैदानातील हुतात्मा स्मारक आणि डोना पॉला बीच दाखवण्यात आला आहे.

73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलानामध्ये, उत्तराखंडची चित्ररथामध्ये हेमकुंड साहिब गुरुद्वारा, डोबरा-चंटी ब्रिज आणि बद्रीनाथ मंदिर दाखवते

भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंट यावेळी राजपथावरील परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

राफेल लढाऊ विमानातील पहिली महिला फायटर पायलट, फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंग आज भारतीय हवाई दलाच्या (IAF) सोहळ्यात सहभाग घेतला होता.

First women Rafael pilot Shivangi Singh
First women Rafael pilot Shivangi Singhsakal

लष्कराच्या जवानांनी केलेल्या अनेक साहसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) सीमा भवानी मोटरसायकल पथकाने प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलानामध्ये सादरीकरण केले.

भारताच्या भूदलाची ताकद असणारे विविध रणगाडे राजपथावर पाहायला मिळाले.

सेंच्युरियन टँक, PT-76, MBT अर्जुन MK-I आणि APC टोपाझच्या तुकड्या दिल्लीतील राजपथ येथे RepublicDay परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या.

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित यंदाच्या दिमाखदार सोहळ्यांची या रणगाड्यांनी शोभा वाढवली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्यावतीने लढाऊ विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

हवाई दलाच्या विविध विमानांनी विविध फॉर्मेशनच्या माध्यमातून चित्तथरारक प्रात्यक्षिके केली. त्यात राफेलसह अन्य लढाऊ विमानांचा समावेश होता.

हवाई दलाच्या ग्रँड फ्लाय-पास्ट 75 विमानाच्या प्रात्यक्षिकांसह पथसंचलनाचा समारोप झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com