पदोन्नती आरक्षण: सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टानं ठेवला निकाल राखून

न्यायमुर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल राखून ठेवला आहे.
Supreme Court
Supreme Courtesakal
Updated on

अुसूचित जातींना नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला. यापूर्वी न्यायमुर्ती नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकून घेतल्या. सुनावणी दरम्यान, अॅटोर्नी जनरल के.के. वेणुगोपाल, अतिरिक्त सॉलिसीटर जनरल बलबीर सिंह आणि इतर काही वरीष्ठ वकीलांनी वेगवेळ्या राज्यांची बाजू मांडली. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या पीठामध्ये न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि जस्टिस बी.आर. गवई यांचा देखील समावेश होता.

Supreme Court
भाजपचा मास्टर प्लान; निवडणुकीपूर्वीच 100 आमदारांचं तिकीट कापणार

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही अशा अनुसूचित जाती आणि जमातींमधील अनेक लोकांना अजूनही ते योग्य स्थान मिळालेलं नाही, जिथे मुख्य प्रवाहातील लोक आहेत असं केंद्राच्या वतीने सांगण्यात आलं होतं. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या पीठामध्ये न्यायमुर्ती संजीव खन्ना आणि जस्टिस बी.आर. गवई यांचा देखील समावेश होता.

Supreme Court
'हेही ISI चे एजंट आहेत?' फोटो शेअर करत कॅप्टन अमरिंदर यांचा सवाल

अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी या प्रकरणावर सुनावणी करताना सांगितलं की, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोकांना ग्रुप ए श्रेणीमधील उच्च पद प्राप्त करणं कठीण जातं. अनुसूचित जातींमधील लोकांना रिक्त पदांच्या भरतीसाठी काही तरी ठोस निर्णय घेण्याची वेळ आता आली असं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com