
छोट्या गाड्या, दोनचाकी, ऑटो रिक्षा आणि ट्रॅक्टर यांवरील जीएसटी कमी करून 18% करण्यात आला आहे, तर इलेक्ट्रिक वाहनांवर तो फक्त 5% झाला आहे.
लक्झरी कार, मोठ्या इंजिन क्षमतेच्या गाड्या आणि 350cc पेक्षा जास्त मोटरसायकलींवर कर वाढवून 40% करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा, शेतकऱ्यांचा खर्च कमी आणि इलेक्ट्रिक वाहन विक्रीला चालना मिळणार आहे.
Auto Sector GST Rate: भारत सरकारने जीएसटी दरांमध्ये मोठे बदल करत ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार छोटी प्रवासी वाहने, दोनचाकी, तीनचाकी आणि ट्रॅक्टर यांवर कर कमी केला आहे, तर लक्झरी कार आणि मोठ्या इंजिन क्षमतेच्या वाहनांवर कर वाढवण्यात आला आहे. या नव्या कर रचनेचा उद्देश मध्यमवर्गीय ग्राहकांना दिलासा देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे आणि इलेक्ट्रिक तसेच हायब्रिड वाहनांच्या विक्रीला चालना देणे हा आहे.