Election Commission : 1 नोव्हेंबरला गुजरात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता; दोन टप्प्यात होणार मतदान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gujarat Assembly Election

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे.

Election Commission : 1 नोव्हेंबरला गुजरात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता; दोन टप्प्यात होणार मतदान!

Gujarat Assembly Election : आता प्रत्येक राजकीय पक्ष गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) तारखांची वाट पाहत आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) सूत्रांवर विश्वास ठेवला, तर निवडणुकीच्या तारखा 1 नोव्हेंबरला जाहीर होऊ शकतात.

तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 1 ते 2 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे 4 ते 5 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.

अलीकडंच, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर न केल्याबद्दल विरोधकांनी केंद्र सरकार आणि आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. पंतप्रधानांना काही मोठी आश्वासनं देण्यासाठी आणि उद्घाटनासाठी वेळ देण्यासाठी हे करण्यात आल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं.

हेही वाचा: Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय

31 ऑक्टोबरला पंतप्रधान मोदी गुजरात दौऱ्यावर

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 31 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व राज्यांच्या युनिटी पोलिस परेडमध्ये ते सहभागी होतील. याशिवाय, ते जांबुघोडा येथील आदिवासींना संबोधित करणार आहेत. यासोबतच बनासकांठामध्ये उत्तर गुजरातला दिल्या जाणाऱ्या पाणी योजनेचं उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा 1 नोव्हेंबरला जाहीर करू शकतं, असं मानलं जात आहे.

हेही वाचा: Cylinder Explosion : औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट; आगीत 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर

निवडणूक जाहीर होताच गुजरातमध्ये आचारसंहिता लागू होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 नोव्हेंबरला निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच गुजरातमध्ये आदर्श आचारसंहिता लागू होईल. त्यानंतर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होतील. यामध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 1 ते 2 डिसेंबर आणि दुसऱ्या टप्प्याचे 4 ते 5 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात घेणार आहे. तर, निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे.