

Youth Murder Friend In Kutch
ESakal
गुजरातमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. कच्छमधील नखतराणा येथे एका मैत्रीचा अंत अशा भयानक पद्धतीने झाला की तुमचा थरकाप उडेल. एका बाजूला जुनी मैत्री होती आणि दुसरीकडे एका मुलीवर प्रेमसंबंध होते. मैत्रीचे रक्तपातात रूपांतर करण्यासाठी हे पुरेसे होते. पोलिसांनी २० वर्षीय तरुणाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडताच परिसरात खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे, खून करणारा संशयित दुसरा तिसरा कोणी नसून मृताचा जवळचा मित्र होता.