BJP | 'भाजपाचं सदस्य व्हा!' विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने थेट नोटीसच काढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Mumbai Unit
'भाजपाचं सदस्य व्हा!' विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने थेट नोटीसच काढली

'भाजपाचं सदस्य व्हा!' विद्यार्थ्यांसाठी कॉलेजने थेट नोटीसच काढली

गुजरातमधल्या एका महाविद्यालयाने चक्क विद्यार्थ्यांसाठी भाजपामध्ये सामील होण्याची नोटीसच जारी केली होती. यानंतर मात्र या महाविद्यालयाच्या प्राचार्यांवर कारवाई करण्यात आली,. तसंच प्राचार्यांनी राजीनामाही दिला आहे. नक्की हे सगळं प्रकरण काय आहे?जाणून घ्या. (Gujarat BJP News)

हेही वाचा: गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट; सुप्रीम कोर्टानं जाफरींची याचिका फेटाळली

गुजरातमधल्या (Gujarat) भावनगर शहरातल्या नर्मदाबाई चत्रभुज गांधी महिला कॉलेजच्या प्राचार्या रजनीबाला गोहिल यांनी विद्यार्थिनींसाठी एक नोटीस जारी केली होती. ज्यामध्ये विद्यार्थिनींना आपले पासपोर्ट साईझ फोटो आणि मोबाईल फोन कॉलेजमध्ये आणायला सांगितलं होतं, तसंच भाजपाचं सदस्यत्व घेण्यासही सांगितलं होतं. यानंतर सोशल मीडियावर ही नोटीस वेगाने व्हायरल होऊ लागली होती.

हेही वाचा: गुजरात दंगल : तिस्ता सेटलवाड यांच्यावर कारवाई, ATS ने घेतलं ताब्यात

या नोटिशीमध्ये लिहिलं होतं की, कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थिनीला हे सूचित केलं जातं की, प्रत्येक विद्यार्थिनीने भाजपाच्या पेज कमिटीच्या सदस्यत्वाच्या नोंदणीसाठी (BJP Member registration) आपला एक पासपोर्ट साईझ फोटो घेऊन यावा. प्रत्येक विद्यार्थिनीसाठी हे आवश्यक आहे की त्यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानात सामील होण्यासाठी मोबाईल फोन सोबत आणावा. या नोटिशीच्या शेवटी असंही लिहिलं होतं की, फक्त भावनगर नगर निगम परिसरात राहणारे विद्यार्थीच भाजपाचं सदस्य बनण्यास पात्र आहेत.

हेही वाचा: NCERT चा मोठा निर्णय; बारावीच्या अभ्यासक्रमातून 'गुजरात दंगली'चा विषय हटवला

प्राचार्य गोहिल यांची सही असणारी ही नोटीस सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाला याची माहिती मिळाली. कॉलेजच्या ट्रस्टींनी कारवाई केली आणि त्यानंतर या प्राचार्यांनी राजीनामा दिला आहे, तसंच ही नोटिसही रद्द करण्यात आली.

Web Title: Gujrat College Issued A Notice For Membership Of Bjp For Students

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpGujarat
go to top