
आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपने पाच कोटी रुपये दिल्याचे सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा हा व्हिडीओ आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.
अहमदाबाद : आज तीन नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ठिकठिकाणी विधानसभेच्या पोटनिवडणुकाही होत आहेत. यामध्ये गुजरातमध्येदेखील आठ जागांवार पोटनिवडणुक पार पडत आहे. मात्र, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने एक व्हिडीओ जाहीर करत असा आरोप केला आहे की, सत्ताधारी भाजपाने काँग्रेसच्या आठ आमदारांना राजीनामा देण्यासाठी कोट्यवधी रुपये दिले होते. या व्हिडिओमध्ये माजी खासदार सोमाभाई पटेल कॉंग्रेसच्या एका सभासदाला सांगत आहेत की, भाजपाने कोणालाही दहा-दहा कोटींपेक्षा जास्त रुपये दिले नाहीत.
हेही वाचा - खुशखबर : लशीआधीच औषध येण्याची शक्यता; दोन्ही टप्प्यातील चाचण्या यशस्वी
आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपने पाच कोटी रुपये दिल्याचे सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा हा व्हिडीओ आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे स्टिंग ऑपरेशन काँग्रेसने केले होते. या व्हिडिओमध्ये सोमाभाई पटेल यांनी म्हटलंय, आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपाने मला पैसे दिले होते. नाही तर कारणाशिवाय एखादा आमदार आपल्या पदाचा राजीनामा का देईल? राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी कोणालाही १० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळाले नाहीत. काही जणांना निवडणुकीत उमेदवारी आणि काहींना पैसे देण्यात आले.
#byelection2020 @INCGujarat એ જાહેર કર્યો વીડિયો @BJP4Gujarat દ્વારા પૈસા અપાયા હોવાનો પૂર્વ mla સોમાપટેલ નો આક્ષેપ pic.twitter.com/efgx1VFbzQ
— kinjal mishra (@kinjalmishra211) November 1, 2020
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी पत्रकारांच्या समक्ष हा व्हिडीओ जाहीर केला आहे. यामध्ये काँग्रेसचे आमदार सोमाभाई पटेल हे वक्तव्य करताना दिसतात. चावडा यांच्या म्हणण्यानुसार, पटेल हे सांगत आहेत की राजीनामा देण्यासाठी त्यांना आणि इतर काही काँग्रेसच्या आमदारांना 10 कोटीपेंक्षा थोडी कमी रक्कम दिली गेली आहे. त्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांचेही नाव घेतले आहे. चावडा यांनी म्हटलंय की शाह आणि पाटील यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा.
हेही वाचा - मलबार नौदल युद्धाभ्यास; चीनला धडकी भरवेल असा भारताचा इतर देशांसोबत सराव
व्हिडीओ खोटा असल्यादा दावा
यादरम्यानच काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले माजी आमदार पटेल यांनी दावा केलाय की हा व्हिडीओ खोटा आहे. आणि ते या खोट्या व्हिडीओच्या प्रसाराबद्दल कायदेशीर कारवाईदेखील करणार आहेत. भाजपा अध्यक्ष पाटीन यांनी आरोप केलाय की पोटनिवडणुकीत काँग्रेसची हार होणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्यानेच त्यांनी ही खोटी खेळी खेळली आहे.
काँग्रेसच्या आठ आमदारांनी दिला होता राजीनामा
यावर्षीच जूनमध्ये गुजरातमध्ये राज्यसभेच्या चार जागांवर झालेल्या निवडणुकीच्या आधीच काँग्रेसच्या आठ आमदारांनी राजीनामा दिला होता. यामुळे भाजपच्या तिसऱ्या उमेदवराला जिंकण्यात मदत झाली होती. याच राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागांवर सध्या पोटनिवडणुका होत आहेत. यामधील पाच जण आता भाजपच्या जागेवर लढत आहेत तर पटेल आता निवडणुक लढवत नाहीयेत.