
‘...हा चित्रपट नाही’; राम रहीमवरच्या याचिकेवर हायकोर्टाने सुनावले
चंदीगड : पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ४) रोहतकच्या सुनरिया तुरुंगातून एक महिन्याच्या पॅरोलवर बाहेर आलेला बलात्काराचा दोषी आणि डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगला (Gurmeet Ram Rahim Singh) बनावट (डमी) असल्याचे सांगणाऱ्याची याचिका फेटाळून लावली आहे. राम रहीम सिंगला बनावटसोबत बदलल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. हायकोर्टाने (high court) ही याचिका निराधार ठरवत याचिकाकर्त्यांना फटकारले आहे.
हा चित्रपट नाही. उच्च न्यायालयाला अशा प्रकरणांची सुनावणी करायची नाही. तुम्ही फिक्शन फिल्म पाहिल्याचे दिसत आहे. पॅरोलवर आलेला राम रहीम गायब कसा होऊ शकतो, असे आज याप्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कर्मजीत सिंह म्हणाले. त्यांनी याचिकाकर्त्याला फटकारत याचिका फेटाळून लावली.
हेही वाचा: दर्यावर राज्य गाजवणाऱ्या कान्होजींविषयीच्या या गोष्टी माहितीये का?
चंदीगड (chandigarh), पंचकुला आणि अंबाला येथील काही तथाकथित डेरा भक्तांनी उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. उत्तर प्रदेशातील बागपत आश्रमात पोहोचलेला गुरमीत राम रहीम सिंग (Gurmeet Ram Rahim Singh) हा खरा नसून बनावट आहे, अशी शंका याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केली होती. त्याचे हाव-भावही खऱ्या गुरमीत राम रहीम सिंगसारखे नसल्याचे म्हटले होते.
त्याचवेळी डेरा सच्चा सौदा व्यवस्थापनाने हे भक्तांची दिशाभूल करण्याचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. डेरा सच्चा सौदाचे प्रवक्ते जितेंद्र कुमार म्हणाले की, याचिका दाखल करणारे डेराचे अनुयायी नाहीत. डेराच्या अनुयायांची गुरुजींवर पूर्ण श्रद्धा आहे. हा सगळा खोडसाळपणाचा कट आहे. याची प्रशासनाने चौकशी करावी.
हेही वाचा: Agneepath Scheme : अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांच्यावरील आरोप खोटे असल्याचे ते म्हणाले. ते उत्तर प्रदेशातील बरनावा आश्रमात आहे. त्यांनी सांगितले की, जवळपास आठ महिन्यांपूर्वीही याच लोकांनी डेरा प्रमुखाच्या जिवाला धोका असल्याचे कारण देत याचिका दाखल केली होती.
Web Title: Gurmeet Ram Rahim Singh High Court Chandigarh Punjab Petition Rejected
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..