झेलेन्स्कीच्या नावाने एका भारतीयाने लाँच केला चहा

गुवाहाटीच्या अरोमिका चहाचे मालक रणजीत बरुआ यांनी लाँच केलेल्या 'झेलेन्स्की' चहाची देशभरात चर्चा सुरु आहे
Zelenskyy Tea in India
Zelenskyy Tea in Indiaसकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून युक्रेनचे सैन्य रशियन सैन्यासोबत जोरदार मुकाबला करत आहे. परंतु, या भीषण युद्धामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असून हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर काही अपवाद वगळता सर्व देशांनी रशियाचा निषेध केला आहे. तसेच युक्रेन बाबत सहानभूती दाखवत अनेकांनी युक्रेनला या युद्धाच्या काळात धीर दिला.

यातच आसामच्या गुवाहाटी येथे अरोमिका चहाचे मालक रणजीत बरुआ यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या सन्मानार्थ नवीन चहा 'झेलेन्स्की' लाँच केला आहे. (Guwahati's Aromica Tea owner Ranjit Baruah has launched new tea 'Zelenskyy' to honour Ukraine President Volodymyr Zelenskyy.)

देशभरात त्यांनी लाँच केलेल्या 'झेलेन्स्की' चहाची देशभरात चर्चा सुरु आहे.अरोमिका चहाचे मालक रणजीत बरुआ म्हणतात,”आम्हाला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे सामर्थ्य, धैर्याचे साम्य आणायचे आहे, ज्यांनी बलाढ्य रशियन सैन्याशी एकट्याने लढा दिला. लोकांना झेलेन्स्की'चहा आवडेल अशी आशा आहे."

Zelenskyy Tea in India
Russia Ukraine War | थेट घरावर रॉकेट हल्ला, अभिनेत्री ओक्साना श्वेत्स मृत्युमुखी

रशिया हा शक्तीशाली देश आहे तर युक्रेन लष्करी सामर्थ्यात कमी आहे. अशा परिस्थितीत युक्रेनचे सैन्य आणि नागरिक आपल्या देशासाठी धैर्याने आणि हिमतीने लढत आहे.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देखील सैन्य आणि नागरिकांना धैर्य आणि मानसिक बळ देत आहे. रशियासारख्या मोठ्या देशापुढे नतमस्तक होण्याऐवजी धैर्याने लढण्याचा निर्णय झेलेन्स्की यांनी घेतला. त्यांच्या या धाडसाचे सर्व जगातून कौतुक केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com