Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

Mahua Moitra Files Police Complaint Against CEC : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. महुआ मोईत्रांनी मतदार यादी आणि SIR प्रक्रियेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
CEC Gyanesh Kumar News

CEC Gyanesh Kumar News

esakal

Updated on

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विरोधकांकडून महाभियोगाचा प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्ष संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत महाभियोग प्रस्तावाची नोटीस देण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हा प्रस्ताव पुढील काही दिवसांत किंवा दोन आठवड्यांत मांडला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com