

Gyanesh Kumar Resignation Demand
esakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्लीत INDIA आघाडीची बैठक झाली. या बैठकीत SIR म्हणजेच मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीत सहा प्रमुख मागण्या मांडल्या. तसेच या मुद्द्यांवर देशभर आंदोलन करण्याचा कार्यक्रमही जाहीर केला.