Gyanvapi : 'ज्ञानवापी' प्रकरणात नवा ट्विस्ट! 'मंदिर नव्हे, मशीद नव्हे, हा बौद्ध मठ...', सुप्रीम कोर्टात याचिका

Gyanvapi Mosque_UP
Gyanvapi Mosque_UPesakal

नवी दिल्लीः वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणात अलहाबाद हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने निर्णय देत मशीद परिसराचा ASI सर्व्हे करण्याची परवानगी दिलेली आहे.

२१ जुलै रोजी वाराणसी जिल्हा कोर्टाच्या न्यायाधीशांनी ज्ञानवापीच्या एएसआय सर्व्हेचे आदेश दिलेले होते. त्यानंतर मुस्लीम पक्षाने सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यानंतर हायकोर्टामध्ये एएसआय सर्व्हे करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. आता हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावलेली आहे. अलहाबाद कोर्टाने सांगितलं की, एएसआयचा सर्व्हे आवश्यक आहे. काही अटी लागू करुन या सर्व्हेची गरज आहे.

Gyanvapi Mosque_UP
Haryana Nuh yatra News : 800 लोकांच्या जमावाने दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; यात्रेवर केला हल्ला; एफआयआर दाखल

या प्रकरणाता आता एक मोठा ट्वीस्ट आलेला आहे. बौद्ध धर्मगुरुंनी सुप्रीम कोर्टात दावा केला आहे की, हा एक बौध मठ आहे. बौध पक्षाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यात म्हटलंय की, ज्ञानवापी हे मंदिर अथवा मशीद नाही तर बौद्ध मठ आहे.

Gyanvapi Mosque_UP
MS Dhoni IPL : स्पॉट फिक्सिंग आयपीएलची काही पाठ सोडेना... धोनी विरूद्ध IPL अधिकारी केसबाबत मोठी अपडेट

बौद्ध धर्मगुरु सुमित रतन भंते हे म्हणतात, देशात असे अनेक मंदिरं आहेत जे बौद्ध मठ तोडून उभे केलेले आहेत. ज्ञानवापीमध्ये आढळून येणारे त्रिशुळ आणि स्वस्तिक चिन्ह बौद्ध धर्माचे आहेत. केदारनाथ अथवा ज्ञानवापी जिथे ज्योतिर्लिंग सांगितलं जात आहे मुळात ते एक बौद्ध स्तूप आहे. ज्ञानवापी मंदिरही नाही आणि मशीदही नाही. तर तो बौद्ध मठ असल्याचं तिसऱ्या पक्षाचं मत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com