MS Dhoni IPL : स्पॉट फिक्सिंग आयपीएलची काही पाठ सोडेना... धोनी विरूद्ध IPL अधिकारी केसबाबत मोठी अपडेट

IPL Spot Fixing MS Dhoni IPS Officer
IPL Spot Fixing MS Dhoni IPS Officeresakal

MS Dhoni IPL : आयपीएल 2013 चा हंगाम ही आयपीएल इतिहासातील एक काळी रात्र होती. या हंगामात स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण बाहरे आले होते. हे प्रकरण जरी आता संपले असले तरी धोनीसाठी मात्र अजून हा चाप्टर ओपनच आहे. आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांच्याविरूद्ध मद्रास उच्च न्यायायलयात एक केस सुरू आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरूद्ध मानहानीची याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांना 8 मार्च 2014 च्या सिंगल बेंचचा निर्णय आणि त्याच्या संबंधीत सर्व दस्तऐवज सादर करण्याचा आदेश दिली आहे. (IPL Spot Fixing MS Dhoni IPS Officer)

IPL Spot Fixing MS Dhoni IPS Officer
MS धोनीच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याचे निधन! अनेक वर्षे केली होती टीम इंडियाची सेवा

धोनीचे वकील पीएश रमन यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना सांगितले की, आयपीएस अधिकाऱ्यांकडून धोनीवर ठेवण्यात आलेले आरोप हे निंदा करण्यासारखे आहेत. ते एक रिटायर्ड आयपीएस अधिकारी आहेत. ते यातून काय सिद्ध करू इच्छितात? हे सर्व क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. मुद्गल आयोगाने यावर लक्ष दिलं होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर लक्ष दिलं आहे. आता पोलीस अधिकाऱ्याला का चिंता वाटत आहे?

यानंतर न्यायालयाने सिंगल बेंचद्वारे 8 मार्च 2014 मध्ये दिलेला आदेश आणि त्याच्या संबंधीत असलेले सर्व दस्तऐवज सादर करण्यास सांगितले आहे. याबाबतची सुनावणी 31 ऑगस्ट पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मॅच फिक्सिंग प्रकरणी मद्रास हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता.

IPL Spot Fixing MS Dhoni IPS Officer
World Cup : 'बुमराह खेळला नाही तर भारताचा पराभव निश्चित...' माजी खेळाडूच्या वक्तव्याने उडाली खळबळ

आयपीएलची 5 विजेतेपदं पटकावून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला तत्कालीन पोलीस महानिरीक्षक संपत कुमार यांना मॅच फिक्सिंग आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणी धोनीच्या संबंधीत कोणत्याही प्रकरणी वक्तव्या करण्यापासून रोखण्यासाठी दिवणी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

यानंतर धोनीने न्यायालयाला 100 कोटी रूपये नुकसान भरपाई देखील देण्यात यावी अशी विनंती केली होती. यानंतर न्यायालयाने 18 मार्च 2014 ला अंतरिम आदेश देत संपत कुमार यांना धोनीच्या संदर्भातील कोणतीही वक्तव्य देण्यास मज्जाव केला होता.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com